कोरोनाविरूध्दच्या लढ्यात धनराज शिंदेची साथ
कोरोनाविरूध्दच्या लढ्यात धनराज शिंदेची साथ,माढा वेल्फेअर फौंडेशनकडून १५ व्हेंटिलेटरची मदत Dhanraj Shinde’s support in the fight against Corona

कुर्डुवाडी/ राहुल धोका - संपूर्ण जग कोविड - १९ महामारीमुळे संकटात सापडले असून गेल्या वर्षभरापासून या साथीच्या रोगाचा सामना करत आहे. परंतु गेल्या वर्षीपेक्षा यावेळीची परिस्थिती वेगळी असून ही दुसरी लाट प्रचंड मोठ्या प्रमाणात हानीकारक ठरत असून यामध्ये आपण आपल्या जवळचे अनेक जण गमावले आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना झालेल्या दुखःत मी कायम तुमच्या सोबत आहे. सध्याची परिस्थिती खूप दुर्दैवी व वेदनादायी आहे. अनेक लोकाना वेळेवर उपचार मिळत नाहीत आणि त्याचा भयंकर परिणाम आपल्याला भोगावा लागत आहे.आरोग्य यंत्रणे वरती प्रचंड ताण येत असून रुग्णालयामध्ये आवश्यक वैद्यकीय उपकरणांची कमतरता जाणवत आहे. त्या अनुषंगाने माझ्याकडे मागणी येईल तशी उपकरणांची उपलब्धतता मी गरजू रुग्णालयांना करून दिलेली आहे अशी माहिती माढा पंचायत समिती सदस्य सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असलेले धनराज शिंदे यांनी प्रतिनिधीशी बोलताना दिली.
माढा वेलफेअर फाऊंडेशनच्यावतीने मदतीचा वाटा उचलत माढा ग्रामीण रुग्णालय, माढा, जयश्री हॉस्पिटल टेंभुर्णी,पाटील हॉस्पिटल टेंभुर्णी, मित्रप्रेम मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल माढा या ठिकाणी व्हेंटिलेटर मशीन उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. तसेच आलेगाव, रांझणी, मोडनिंब, माढा, कंदर, करकंब व उंबरे येथील केअर सेंटर्स ना त्याचबरोबर कुर्डूवाडी येथील साखरे हॉस्पिटल, आधार हॉस्पिटलला ऑक्सिजन कॉन्सेंट्रेटर्स मशीन पुरवण्यात आलेल्या आहेत. यातील मदतीचा काही भाग येणाऱ्या आठवड्यात पूर्ण केला जाणार आहे.
माढा वेल्फेअर फौंडेशनने लऊळ येथील कोविड केअर सेंटर सुरु करण्याकरिता आर्थिक स्वरुपाची मदत केलेली आहे.तसेच काही प्राथमिक आरोग्य केंद्रमध्ये निर्जंतुकीकरण साहित्याचे वाटप केले आहे. रांझणी येथील कोविड केअर सेंटर करिता आपत्कालीन विजेची सोयीकरिता इन्व्हरटरची मदत केलेली असून व कुर्डू येथील कोविड केअर सेंटरला आर्थिक स्वरुपाची मदत करण्यात येत आहे.
या मदत उभारणीमध्ये माझ्या कुटुंबीयांबरोबरच बाहेरील इतर संस्थांकडून देखील काही प्रमाणात मदत उपलब्ध होत आहे. याप्रसंगी धनराज शिंदे यांच्या मातोश्री सौ शारदाताई शिंदे यांनी देखील या मदतीमध्ये स्वतः जवळील बचतीची रक्कम या उपक्रमाला उपलब्ध करून दिली आहे.
‘सोन्यासारख्या माणसांना माझ्या लेखी अधिक किंमत असून त्यांच्या जीवाचे मोल कशातच होऊ शकत नाही ’ असे त्या यावेळी म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या या कठीण प्रसंगात मी आणि माझे कुटुंबीय सर्वोतोपरी मदत करण्यास आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. आपण सर्वांना धीराने या साथीचा सामना करावा लागणार असून आपण सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.