RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याबाबत केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
हायलाइट्स:
- उर्जित पटेल यांच्या जागी डिसेंबर २०१८ मध्ये दास यांची आरबीआयचे गव्हर्नर म्हणून नियुक्ती करण्यात आली.
- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने दास यांची पुनर्नियुक्ती करण्याच्या निर्णयाला मंजुरी दिली आहे.
- दास हे १९८० च्या बॅचचे तमिळनाडू केडरचे आयएएस (IAS) अधिकारी आहेत.
दरवाढीची झळ कायम ; सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या किमतीत झाली वाढ
६ फेब्रुवारी १९५७ रोजी भुवनेश्वर (ओडिसा) मध्ये जन्मलेले शक्तिकांत दास यांनी इतिहास विषयात पदव्युत्तर पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले असून ते १९८० च्या बॅचचे तमिळनाडू केडरचे आयएएस (IAS) अधिकारी आहेत. ते अर्थ मंत्रालयाच्या आर्थिक व्यवहार विभागात सहसचिव अर्थसंकल्प, तमिळनाडू सरकारच्या महसूल विभागात आयुक्त आणि विशेष आयुक्त, तमिळनाडूच्या उद्योग विभागाचे सचिव आणि इतर विविध पदांवर कार्यरत होते. मे २०१७ पर्यंत आर्थिक व्यवहार सचिव होते. पटेल यांनी आरबीआय गव्हर्नरपद सोडल्यानंतर दास यांना घाईघाईत आरबीआयचे गव्हर्नर बनवण्यात आले.
खूशखबर ; ‘पीएफ’वरील व्याजाला अर्थमंत्रालयाने दिली मंजुरी, यंदा मिळणार इतकं व्याज
आतापर्यंतच्या नीचांकी पातळीवर पॉलिसी दर
गुंतागुंतीच्या मुद्द्यांवर एकमत निर्माण करण्यात विश्वासू व्यक्ती म्हणून दास यांना ओळखले जाते. दास यांच्या कार्यकाळात आरबीआयने धोरणात्मक व्याजदरात लक्षणीय घट केली आहे आणि हे विक्रमी खालच्या पातळीवर आहेत. याआधी दास यांनी वर्ल्ड बँक, आशियाई विकास बँक (ADB), न्यू डेव्हलपमेंट बँक (NDB) आणि एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँक (AIIB)मध्ये भारताचे गव्हर्नर म्हणून काम पाहिले आहे. तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील IMF, G20, BRICS, SAARC इत्यादी परिषदांमध्येही त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले आहे.
आरबीआय कायद्यानुसार, सरकार मध्यवर्ती बँकेच्या गव्हर्नरची नियुक्ती करते. आरबीआय गव्हर्नरचा कार्यकाळ ५ वर्षांपेक्षा जास्त असू शकत नाही, पण सरकारची इच्छा असेल, तर ते एका व्यक्तीला सलग दुसऱ्यांदा आरबीआय गव्हर्नर म्हणून नियुक्त करू शकते.