महाविकास आघाडीचे तीन हजार म्हणजे लबाडा घरचे जेवण -डॉ.नीलम गोऱ्हे
मुंबादेवी येथे शायना एन.सी ,शिवसेना महायुती उमेदवारांच्या प्रचार सभा
मुंबई /पुणे/ ज्ञानप्रवाह न्यूज- राज्यात 2019 पासून 2024 पर्यंत महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी तीन रुपये न देणाऱ्या सरकारने आता एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या आधारे आमचे सरकार आल्यास तुम्हाला 3000 रुपये देऊ अशी घोषणा केली. ही घोषणा म्हणजे लबाडाच्या घरचे जेवण आहे अशी मिश्किल प्रतिक्रिया विधान परिषद उपसभापती डॉ.नीलम ताई गोऱ्हे यांनी शायना एन.सी.यांच्या प्रचार सभेत दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सत्ता हातात येताच राज्यात अनेक प्रकल्प राबविले. त्याचा एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे क्लस्टर डेव्हलपमेंट म्हणजेच सामुहिक विकास. मुंबईचा विकास साधण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आणि याचा फायदा अनेक सोसायटीला झाला.फक्त एका बिल्डिंगचा विकास न करता जवळच्या पाच – सहा बिल्डिंगचा विकास साधणार. मुंबादेवी विभागाचा क्लस्टर डेव्हलपमेंट द्वारा विकास करण्याची योजना आहे अशी माहिती शायना एनसीए यांच्या प्रचार सभेत नीलम गोऱ्हे यांनी दिली कामाठीपुरा येथील या श्री विठ्ठल रुक्मिणी सभागृहात त्या बोलत होत्या.
मुंबईचा व महाराष्ट्रचा विकास हे केवळ महायुती सरकार द्वारेच आपण करू शकतो यासाठी येणाऱ्या निवडणुकीत महायुतीचे सरकार आपल्याला मजबूत करायचे आहे.
सगळ्यात जास्त विश्वास आपण कोणावर ठेवावा ? तर अशी चार-पाच माणसे भारतामध्ये आहेत. पहिले आहेत नरेंद्र मोदी की ज्यांच्यावरती पंतप्रधान म्हणून विश्वास ठेवल्यावर त्यांनी राम जन्मभूमी मंदिर बांधले,महिलांना आरक्षण दिले,लखपती निधी योजना आणली,धुळीचा धुराचा त्रास होतो चुलीमध्ये म्हणून त्यांनी निरधुर चुली आणल्या.
ग्रामीण भागामध्ये,शहरामध्ये महिलांसाठी सुद्धा असंच विश्वासार्ह काम केलं ते आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे.महिलांसाठी अर्ध्या दरात एसटी प्रवास त्यांनी सुरू केला. केवळ आर्थिक फायदाच नव्हे तर महिलांच्या सुरक्षितेसाठी त्यांनी योजना राज्यात राबवल्या.

महाविकास आघाडीचे नेते आज सांगत आहेत की,आम्ही तीन हजार रुपये देऊ.मला असं वाटतं की ती कोल्हा आणि करकोच्याची गोष्ट आहे.जेवायला घरी बोलवायचे आणि जेवायला खीर ती ताटलीमध्ये द्यायची.ती चाटून खायला लागेल आणि ती खायला पण येणार नाही.बोलाचा भात आणि बोलाचीच कढी म्हणजे महाविकास आघाडी.! तुम्हाला तीन हजार रुपये मिळतील.14 वर्षांमध्ये तुम्ही तीन रुपये सुद्धा दिले नाहीत तर आत्ता कुठून तुम्ही महिलांना तीन हजार रुपये देणार ? असा सवाल डॅा.नीलम गोऱ्हेनी केले.
मुंबईची सुरक्षा महायुतीच्या काळात अत्यंत सुरक्षित आहे.आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या सुरक्षेला सर्वप्रथम प्राधान्य दिले आणि आपला देश सुरक्षित राहिला आहे.आपल्या राज्याची विशेषता मुंबईची सुरक्षा जर आपल्याला अबाधित ठेवायची असेल तर या येणाऱ्या विधानसभेत महायुतीचे उमेदवार आपल्याला निवडून द्यायचे आहेत असे प्रतिपादनही महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती व शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी केले.राज्यात युतीचे सरकार म्हणजेच महिलांची सुरक्षा व महिलांचा सन्मान आहे यासाठी आपण शायना एन सी यांना विधान सभेत पाठवायचे आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत बनवण्यासाठी आणि आतंकवादा पासून देशाची सुरक्षा करण्यासाठी महायुतीचे उमेदवार निवडून एक मजबूत व स्थिर सरकार आणण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी मतदान केले पाहिजे असे आवाहनही डाँ.नीलमताई गोऱ्हे यांनी प्रचार सभेत माजी आमदार अतुल शहा , शिवसेना उपनेत्या आशा मामेडी, विभाग प्रमुख दिलीप नाईक, महिला विभाग प्रमुख नीलम पवार,अर्जुन करपे असंख्य शिवसैनिक व महायुतीचे असंख्य कार्यकर्ते प्रचार सभेत उपस्थीत होते.

Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.