धक्कादायक! पेटता फटाका डोळ्यात शिरल्याने ९ वर्षीय मुलाचा डोळा झाला निकामी


हायलाइट्स:

  • फटाके फोडत असताना अचानक फटाका डोळ्यावर लागल्यामुळे नऊ वर्षाचा डोळा निकामी झाला आहे.
  • ही हृदयद्रावक घटना हिंगोलीच्या औंढा तालुक्यातील गोजेगाव गावामध्ये घडली.
  • या चिमुकल्यावर हैदराबाद येथे सध्या उपचार सुरू आहे.

हिंगोली: सण उत्सव म्हटलं की आनंदाला उधाण येतं, त्यातच दिवाळीचा सण म्हटलं तर मुलांच्या आनंदाला पारावार उरत नाही. दिवाळी सर्रास लहान मुलं फटाके फोडून आनंद साजरा करतात. मात्र, फटाके फोडताना सावधगिरी न बाळगल्यास काय होऊ शकते हे औंढा तालुक्यातील गोजेगाव येथे घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेवरून स्पष्ट झाले आहे. गोजेगाव गावामध्ये गुरुवारी सकाळी फटाके फोडत असताना अचानक फटाका डोळ्यावर लागल्यामुळे नऊ वर्षाचा साईनाथ घुगे या चिमुकल्याचा डोळा पूर्णपणे निकामी झाला आहे. (a nine year-old boy lost his eye due to a firecracker in aundha of hingoli district)

सध्या या चिमुकल्यावर हैदराबाद येथे सध्या उपचार सुरू आहे. साईनाथला प्राथमिक उपचाराकरिता नांदेड येथील रुग्णालयात दाखल केले होते. तेथे उपचार झाला नसल्याने त्याला पुढील उपचाराकरिता हैद्राबाद येथे हलविण्यात आले.

क्लिक करा आणि वाचा- करोना: राज्यात आज १,३३८ नव्या रुग्णांचे निदान, बरे होणाऱ्या रुग्णसंख्येत घट

साईनाथ गुरुवारी सकाळी फटाके फोडत होता. मात्र, अचानक त्यातील एक फटाका उडून त्याच्या डोळ्याला लागला. या फटाक्यामुळे साईनाथच्या डोळ्याला मोठी दुखापत झाली. साईनाथच्या डोळ्यातून रक्त वाहू लागले. या अपघातानंतर साईनाथला तातडीने नांदड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्याच्या डोळ्याला मोठी दुखापत असल्याने त्याला हैदराबाद येथे हलवण्यात आले.

क्लिक करा आणि वाचा- आर्यन खानची आजची रात्र तुरुंगातच; उद्या सकाळी सुटकेची शक्यता

सध्या दिवाळी असल्याने लहान मुले उत्साहात फटाके फोडत आहेत. परंतु फटाक्यांचे दुष्परिणामही होताना दिसत आहेत. फटाक्यामुळे चिमुकल्या साईनाथला आपला डोळा गमवावा लागला हे त्याचे ताजे उदाहरण आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांची विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

क्लिक करा आणि वाचा- आर्यन खानच्या जामीन आदेशाची प्रत जारी; पाहा, ‘अशा’ आहेत कठोर अटीSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: