Mamata Banerjee in Goa: ‘काँग्रेसमुळे मोदीजी शक्तीशाली’, ममतांकडून एका दगडात दोन पक्षी


हायलाइट्स:

  • ममता बॅनर्जी गोव्यात
  • विजय सरदेसाई यांच्या ‘गोवा फॉरवर्ड पक्षा’सोबत युती
  • ‘काँग्रेस भाजपसाठी टेलिव्हिजन रेटिंग्ज पक्ष बनलाय’

पणजी : काँग्रेसमुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप इतकी शक्तीशाली होऊ शकलीय. काँग्रेसच भाजपसाठी प्रचारक म्हणून काम करत आहे, असं वक्तव्य करत तृणमूल काँग्रेस अध्यक्ष आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी एका बाणात दोन राष्ट्रीय पक्षांना आपल्या निशाण्यावर घेतलंय.

गोवा फॉरवर्ड पक्षासोबत युती

सध्या, ममता बॅनर्जी गोवा दऱ्यावर आहेत. गोवा विधानसभा निवडणुकीसाठी ममता बॅनर्जींनी प्रचाराला सुरूवात केलीय. या दरम्यान, विजय सरदेसाई यांचा पक्ष ‘गोवा फॉरवर्ड पक्षा’सोबत युतीची घोषणीही ममता बॅनर्जी यांनी केलीय. सरदेसाई आतापर्यंत भाजप सरकारसोबत राहिलेत.

विरोधी पक्षांनी एकत्र येण्याची गरज

काँग्रेससोबत कोणत्याही निवडणुकीत हातमिळवणी करण्याची शक्यता यावेळी ममता बॅनर्जी यांनी फेटाळलीय. ‘विरोधी पक्षांना एकत्रित करण्याची गरज लक्षात घेण्यात काँग्रेस अपयशी ठरलंय’, असं म्हणतानाच ‘भाजपचा सामना करण्यासाठी सर्व स्थानिक पक्षांना एकत्रित येण्याची गरज’ त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केलीय. देशाच्या संविधानाचा पाया मजबूत करण्यासाठी हे गरजेचं असल्याचं त्यांनी म्हटलंय.

Leander Paes Join TMC: टेनिस खेळाडू लिएन्डर पेस, अभिनेत्री नफीसा अली तृणमूलमध्ये दाखल
Mamata Banerjee in Goa: ‘भाजपकडून कॅरेक्टर सर्टिफिकेटची गरज नाही’, ममता गोव्यात कडाडल्या
मोदीजी दिवसेंदिवस शक्तीशाली होत चालले आहेत आणि याचं कारण काँग्रेस आहे. काँग्रेस भाजपसाठी टेलिव्हिजन रेटिंग्ज पक्ष बनलाय. जर त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही तर त्याचा फटका देशाला बसेल. परंतु, देशानं हे सहन का करावं? देशाकडे पुरेशा संधी आणि पर्याय आहेत, असंही यावेळी ममतांनी म्हटलंय.

‘काँग्रेसनं संधी गमावली’

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या वेळी काँग्रेसनं तृणमूल सोबत गाठ बांधण्याची संधी गमावली. त्यांनी डावे आणि इंडियन सेक्युलर फ्रंटसोबत काम करण्याचा निर्णय घेतला. बंगालमध्ये भाजप आणि तृणमूलचा नामोनिशाण उरणार नाही केवळ महाआघाडी राहील, असं त्यावेळी काँग्रेस अध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी म्हटलं होतं, असं सांगत ममतांनी ‘तो’ अंदाज चुकीचा ठरल्याचं म्हणत काँग्रेसला टोला लगावलाय. पश्चिम बंगालमध्ये डाव्यांना एकही जागा मिळू शकली नाही.

आता गोवा विधानसभा निवडणुकीत गोव्यात गोवा फॉरवर्ड पक्षासोबत आघाडी करण्यास काँग्रेसनं नकार दिला. त्यानंतर विजय सरदेसाई यांनी तृणमूलशी हातमिळवणी केलीय.

Ashok Gehlot: मी जादूगार, म्हणून चालला खेळ; मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य
Lalu Prasad Yadav: पाण्याची तहान ‘आईसक्रीम’वर, लालुंचा जुगाड चर्चेतSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: