स्थानिक देशी वनस्पतींच्या बियांचे अनोखे बीज चित्र

स्थानिक देशी वनस्पतींच्या बियांचे अनोखे बीज चित्र Unique seed picture of seeds of native plants

पुण्यातील हरित कार्यकर्त्यांचा अनोखा उपक्रम
  पुणे- बायोस्फिअर्स, सांस्कृतिक विद्या मंदिर शिक्षण संस्था, पुणे,देवराई संस्था,सरदार हैबतराव शिळीमकर प्रतिष्ठान,श्रीकृष्ण ट्रेडिंग, रायरेश्वर ग्रामस्थ संस्था,रायरी सत्यवीर मित्र मंडळ, आम्ही भोरकर संस्था,सामाजिक वनीकरण, पुणे आणि सह्याद्री इंटर न्याशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १४ मे २०२१, अक्षय्य तृतीयेचे औचित्य साधून विद्या विकास विद्यालय व प्रशाला क्रीडांगण, सहकार नगर १, पुणे येथे बीज-चित्र साकारण्यात आले. सदर बीज चित्राचे अनावरण पुण्याच्या उपमहापौर श्रीमती सरस्वती शेंडगे, नगरसेविका श्रीमती अश्विनी कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. याप्रसंगी विविध बिजांचे पूजन उपस्थित महिला वर्गाकडून करण्यात आले. गारंबी शेंगेचे वापर करून अनोखा बीज नाद देखील करण्यात आला. बीज चित्र किंवा बीज रांगोळी या संकल्पनेवर आधारित स्थानिक देशी वृक्षांच्या - वेलींच्या बिया आणि फळे वापरून ही अनोखी कलाकृती साकारण्यात येणार आहे.सदर बीज चित्र हे २०२१ हजार स्के. फु. इतक्या क्षेत्रफळाचे होते. कदाचित भारतातील हे पहिले अशा प्रकारचे बीज चित्र असणार आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात देशी,आपल्या मातीतल्या बियांचा वापर केला गेला.
स्थानिक देशी वनस्पतींच्या बियांचे अनोखे बीज चित्र
   या बीज-चित्राच्या माध्यमातून जनमानसात बीज संस्कृती रुजावी, स्थानिक देशी वनस्पतींच्या बियांचे, परंपरागत धान्य,कडधान्य, औषधी, खाद्यपयोगी वनस्पती वाणाचे संवर्धन, जतन व्हावे या उद्देशाने या बीज चित्राची निर्मिती करण्यात आली आहे. सदर बीज चित्राच्या निर्मितीसाठी अनेक राज्यातील वनस्पती अभ्यासक,बीज संवर्धन,बीज संकलक यांचे मोलाचे योगदान लाभले आहे. हरितीकरणाला प्रोत्साहन मिळावे, बियाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने शाश्वत आणि पर्यावरणाला अनुकूल असा विकास व्हावा, हा जैविक ठेवा किंवा वारसा अक्षय्य रहावा या उद्देशाने ही चित्रकृती साकारली गेली आहे. सदर बीज चित्रासाठी ४५ सपुष्प वनस्पतींच्या बिया आणि काही प्रमाणात फळे यांचा वापर करण्यात आला. हे बीज महाराष्ट्राच्या कानाकोपर्यातून विषेत: १२ मावळ, चंद्रपूर, सिल्लोड, भीमाशंकर, पुणे जिल्हा,उस्मानाबाद, लातुरसह इतर ठिकाणा हूनही संकलित करण्यात आले होते. यापुढेही शिव बीज-चित्र संकल्पना इतर अनेक ठिकाणी राबवणार आहोत.

सदर बीज चित्रात हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, आद्य वृक्षसंवर्धक छत्रपती शिवाजी महाराज, प्राणवायूचा अखंड स्त्रोत असणाऱ्या वृक्षाची छबी, सामाजिक सेवेमध्ये अविरत अशी योगदान देणारे भारताचे अग्रगण्य असे व्यक्तिमत्व रतन टाटा आणि सध्या काळाची गरज असणाऱ्या प्राणवायूचा सिलेंडर या सर्वांचे एकात्मिक मिळून बीज चित्र साकारण्यात आले आहे आहे. सदर बीज चित्राची संकल्पना डॉ. सचिन अनिल पुणेकर यांची असून, या बीज-चित्राचे रेखाटन मंगेश निपाणीकर आणि सहकाऱ्यांनी केले. 

या अनोख्या उपक्रमास पराग शिळीमकर,रघुनाथ ढोले, विनायक जांभोरकर, श्रीमती दिपा मोरे, दत्तात्रय गायकवाड,सुनील जंगम,महेंद्र पाखरे, मिलिंद कुलकर्णी, अमित पुणेकर, गणेश मानकर आदिंचे मौलिक योगदान लाभले.

आयुष्याचे खऱ्या अर्थाने करायचे असेल चीज, तर संवर्धित करूयात देशी बीज

  डॉ.सचिन अनिल पुणेकर             पर्यावरण अभ्यासक आणि संस्थापक अध्यक्ष, बायोस्फिअर्स                      (९५०३०९६४६९; ९३७२७५५५४८)   

ई-मेल: [email protected]; [email protected]

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: