पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक धीरज घाटे यांनी गरजु कुटुंबांना पाठविले धान्य
पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक धीरज घाटे यांनी गरजु कुटुंबांना पाठविले धान्य Pune Municipal Corporation corporator Dheeraj Ghate sent grain to needy families

पंढरपूर- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाँकडाऊन मुळे अनेक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे.पंढरपूरातील नागरिकही आर्थिक तणावा खाली आहेत. याची माहिती मिळताच पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक आणि हिंदू गर्जना प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा धीरज रामचंद्र घाटे यांनी येथील ५०० गरजु कुटुंबाना धान्य पाठवून दिले आहे.पंढरपूर विभागाचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते याचे वाटप करण्यात आले.
घाटे कुटुंबिय मुळचे पंढरपूरचे असून नगरसेवक धीरज घाटे अनेक वर्षापासून पुणे येथे स्थायिक झाले आहेत. पुणे परिसरात त्यांचे मोठे सामाजिक आणि राजकीय कार्य असून ते या कामाच्या माध्यमातून नगरसेेवक झाले परंतु त्यांचे पंंढरपूरचे नाते अतूूट राहिले.
पंढरपूरातील त्यांचे चुलत भाऊ अवधुत घाटे यांनी येथील अनेक कुटुंबाची आर्थिक स्थिती बिकट असल्याची माहिती त्यांना कळवली होती. पंढरपूरचे अर्थचक्र वारीवर फिरत असून मागील सव्वा वर्षात पाचही यात्रा कोरोनामुळे भरल्या नाहीत आणि उसबील मिळाली नसल्यानेही सर्वसामान्य कुटुंबांचे अर्थचक्र बिघडले आहे . याची धीरज घाटे यांनी तातडीने दखल घेवून जवळपास तीन लाख रूपयांचा किराणा माल पंढरपूर येथे पाठवून दिला आहे. या मालाचे वाटप प्रांताधिकारी सचिन ढोले यांच्या हस्ते उत्पात समाजाच्या उपासना मंदिर येथून करण्यात आले.
नगरसेवक धीरज घाटे यांची पंढरपूरशी नाळ जुळलेली – प्रांताधिकारी सचिन ढोले
यावेळी बोलताना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी नगरसेवक धीरज घाटे यांचे पंढरपूरशी नाळ जुळली असल्याने त्यांनी येथे मदत पाठवली असल्याचे गौरवोद्गार काढले.
नगरसेवक धीरज घाटे यांनी पुणे येथे भव्य कोविड रूग्णालय सुरू केले असून आपल्या भागात ते औषधांसह जीवनावश्यक वस्तुंचे मोफत वाटप करीत आहेत. पंढरपूर येथील अनेक रूग्णांना पुणे येथील रूग्णालयात बेड मिळवून देण्याचे मोठे काम घाटे यांच्या मार्फत सुरू आहे.
या धान्य वाटप प्रसंगी माजी नगरसेवक शैलेश बडवे, ऋषिकेश उत्पात, श्रीकांत हरिदास, भागवत महाजन,ओंकार जोशी,महेश काळे,कैवल्य उत्पात, रोहित पुरंदरे आदीसहित मंदिर परिसरातील व्यापारी वर्ग,तरुण सहकारी मित्र उपस्थित होते.
आमदार गोपीचंद पडळकर आणि युवक नेते प्रणव परिचारक यांच्या हस्ते ही काही किराणा मालाच्या किटचे गरजूंना वाटप करण्यात आले.