road accident : पिकअप दरीत कोसळून भीषण अपघात; १२ जण ठार, अनेक जखमी


डेहराडूनः उत्तराखंडमधील डेहराडून जिल्ह्यात आज सकाळी भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. चक्रता येथे झालेल्या भीषण अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर इतर अनेक जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. कार दरीत पडल्याने हा अपघात झाला.

डेहराडूनच्या चक्राता तहसीलच्या बायला गावात हा भीषण अपघात झाला. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. या अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत. मालवाहतूक वाहनावर चालकाचं नियंत्रण सुटल्याने त खोल दरीत कोसळल्याने हा अपघात झाला. बचाव पथक आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी या अपघातानंतर मृतांबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. तसंच प्रशासनाला मदत आणि बचावकार्य वेगाने करण्याचे आदेश दिले आहेत. जखमींवर तातडीने उपचार करण्याची सूचनाही त्यांनी दिली आहे.

आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. अपघात मोठा आहे. एका व्यक्तीची प्रकृती चिंताजनक आहे. त्याला रुग्णालयात हलवण्यात आले आहे. ६ ते ७ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. हा अपघात खोल दरीत झाला, काही सांगता येत नाही, असं चक्राताचे आमदार प्रीतम सिंह यांनी सांगितले.

jawan martyred : जम्मू-काश्मीर: LOC जवळ भूसुरुंग स्फोटात २ जवान शहीद, तीन जखमी

हा बस अपघात नाही. गावकऱ्यांना घेऊन एक पिकअप वाहन निघाले होते. गावाच्या पहिल्या वळणावर हे वाहन दरीत कोसळले. बचाव सुरू आहे, अशी माहिती डेहराडूनचे (ग्रामीण) पोलीस अधीक्षक स्वतंत्र सिंह यांनी दिली.

bus fell into a gorge : बस दरीत कोसळून भीषण अपघात; ८ जणांचा मृत्यू, PM मोदींकडून मदत घोषितSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: