आनंद महिंद्रांनी शब्द पाळला; ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यांना गिफ्ट दिली XUV ७००
टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या नीरज चोप्रा आणि सुमित अंतील यांना शनिवारी (३० ऑक्टोबर) ही गोडी भेट म्हणून देण्यात आली. नीरव चोप्राला दिलेल्या गाडीवर सोनेरी रंगातील भाला फेकणारा खेळाडू आहे. त्याच्या पुढे ८७.५८ लिहिले आहे. नीरजने ८७.५८ मीटर अंतर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले होते.
वाचा- INDvsNZ : जर न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाला, तर टीम इंडिया सेमी फायनलमध्ये जाणार का?
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भालाफेक प्रकारात सुवर्णपदक जिंकणारा पॅरालिम्पियन सुमित अंतिल यालाही हे विशेष वाहन देण्यात आले आहे. तो आपल्या कुटुंबासह कारच्या शोरूममध्ये गेला आणि तेथे त्याच्याकडे गाडीचे हस्तांतरण करण्यात आले. या वाहनावर अॅथलीट भाला फेकत असून त्यावर ६८.५५ असे लिहिले आहे. सुमितने ६८.५५ मीटर अंतर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले होते.
वाचा- न्यूझीलंडविरुद्ध विजयासाठी भारतीय संघात होणार ३ बदल; पाहा अशी असेल टीम इंडिया
कशी आहे XUV ७०० Javelin Edition
ऑलिम्पिक सुवर्ण विजेत्यांसाठी ही खास गाडी तयार करण्यात आली आहे. या एसयूव्ही कारला गोल्डन लूक देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. समोरच्या उभ्या ग्रिलपासून रिअर डेकल्स आणि ब्रँड लोगोवर गोल्डन एलिमेंट्स दिसतात. एसयूव्हीच्या आतमध्येही अनेक ठिकाणी गोल्डन एलिमेंट्स वापरण्यात आले आहेत. त्यामुळे कारला एकसमान गोल्डन टच मिळतो. जॅव्हलिन एडिशनची वैशिष्ट्ये महिंद्रा एसयूव्हीच्या स्टँडर्ड मॉडेलसारखी आहेत.
वाचा- कोहलीनंतर पाकिस्तानी पत्रकाराचा या कर्णधाराला बेताल सवाल; खेळाडू परिषदेतून उठून…
XUV ७०० लाँच झाल्यापासून आतापर्यंत ६५,००० पेक्षा जास्त बुकिंग मिळाल्याचे कंपनीने सांगितले. ग्राहकांसाठी डिलिव्हरी देखील आजपासून सुरू होणार आहेत आणि कंपनीने पुढील वर्षी १४ जानेवारीपर्यंत किमान १४,००० XUV ७०० डिलिव्हरी करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
XUV ७०० ची किंमत
फ्लॅगशिप XUV सुरुवातीला ११.९९ लाख रुपये (एक्स-शोरूम) लाँच करण्यात आली होती. कंपनीला XUV ७०० साठी पहिले २५,००० बुकिंग मिळाल्यानंतर किमती वाढवण्यात आल्या आहेत. सध्या कारची किंमत १२.४९ लाख रुपये (एक्स-शोरूम) ते २२.८९ लाख रुपये (एक्स-शोरूम) टॉप-स्पेक ट्रिम AX7 लक्झरी (सात सीटर) + AWD साठी आहे.