IND vs NZ: न्यूझीलंडचे खेळाडू सोडाच एकटे पंच ठरले आहेत भारतावर भारी, २०१४ पासून ठरले अनलकी…


IND vs NZ : दुबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये आजचा सामान रंगणार असला तरी तरी जोरदार चर्चा सुरु आहे ती या सामन्यातील एका पंचांची. कारण २०१४ सालापासून हे पंच जेव्हा भारताच्या विश्वचषकातील सामन्यात काम करत होते, तेव्हा भारताला विजय मिळालेला नसल्याचे पाहायला मिळाले आहे. हे एकच पंचच भारताच्या संघावर भारी पडलेले पाहायला मिळत आहेत.
रिचर्ड केटलब्रो २०१४ पासून जवळपास सर्व आयसीसी स्पर्धांमध्ये बाद फेरीत टीम इंडियासाठी ‘अनलकी’ ठरले आहेत. रिचर्ड केटलब्रोने गेल्या काही वर्षांत भारताने खेळलेल्या जवळपास सर्वच आयसीसी बाद फेरीच्या सामन्यांमध्ये जबाबदारी पार पाडली आहे. टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारताला न्यूझीलंड संघाचा सामना करावा लागणार आहे. भारतासाठी हा सामना एक प्रकारे उपांत्यपूर्व फेरीचा सामना असणार आहे. आज भारताचा पराभव झाला, तर स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचण्याची शक्यता फारच कमी होईल. सहा दिवसांच्या विश्रांतीनंतर भारतीय क्रिकेट संघ आज टी-२० विश्वचषक २०२१ च्या सुपर-१२ टप्प्यात न्यूझीलंडशी भिडणार आहे. भारताला पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्या सामन्यात १० गडी राखून पराभव पत्करावा लागला होता आणि स्पर्धेत टिकून राहण्यासाठी टीम इंडियाला आजच्या सामन्यात विजयाची नोंद करावी लागणार आहे. दोन्ही संघांमध्ये हा सामना दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविण्यात येणार आहे. आज सोशल मीडियात चर्चिली जाणारी गोष्ट म्हणजे इंग्लंडचे रिचर्ड केटलब्रो या सामन्यात मैदानी पंच म्हणून काम पाहणार आहेत. २०१४ पासून ज्या सामन्यांमध्ये केटलब्रो आयसीसी टूर्नामेंटमध्ये अंपायर होते, त्या सर्व सामन्यांमध्ये भारताचा पराभव झाला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात पुन्हा एकदा केटलब्रो पंच म्हणून काम पाहणार असल्याने खेळाडूंची नाही, तर चाहत्यांची तारांबळ उडाली आहे.

अनलकी रिचर्ड केटलब्रो
पंच रिचर्ड केटलब्रो हे नेहमीच टीम इंडियासाठी अनलकी ठरले आहेत. २०१४ च्या टी-२० विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध, २०१५ च्या आयसीसी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध, २०१६ च्या टी-२० विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत वेस्ट इंडिजविरुद्ध, २०१७ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पाकिस्तानविरुद्ध आणि २०१९ च्या विश्वचषकात न्यूझीलंडविरुद्ध भारताने सामना खेळला होता. या सर्व सामन्यांमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. आणि प्रत्येकवेळी केटलब्रो मैदानी पंच म्हणून काम पाहत होते.

भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरनेही एक मीम्स ट्विटरवर शेअर केले आहे. आणि ‘भारतीय क्रिकेट चाहत्यांना हॅप्पी हॅलोविन’ असं कॅप्शन दिलं आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: