गडचिरोली जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; जीवित अथवा वित्त हानी नाही!


हायलाइट्स:

  • जिल्ह्यात रविवारी भूकंपाचे सौम्य धक्के
  • भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल
  • जीवित अथवा वित्त हानी झालेली नाही

नागपूर :गडचिरोली जिल्ह्यात रविवारी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. रविवारी संध्याकाळी ६.४८ वाजता जिल्ह्यातील सिरोंचा परिसरालगत भूकंपाचे (Gadchiroli Earthquake) हादरे बसले. या भूकंपाची तीव्रता ४.३ रिश्टर स्केल इतकी होती.

हवामान खात्याच्या सेस्मॉलॉजी विभागाने या भूकंपाची पुष्टी केली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हा नागपूरपासून २५५ किलोमीटर अंतरावर होता. सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवित अथवा वित्त हानी झालेली नाही.

coronavirus update करोना: राज्यात आज १,१७२ नव्या रुग्णांचे निदान, मृत्यूसंख्येत घट

गेल्या वर्षीही विदर्भापासून १०० किलोमीटरच्या अंतरावरील मध्य प्रदेशातील छिंदवाडा येथे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात चार भूकंपांची नोंद करण्यात आली होती. ३१ ऑक्टोबर रोजीच छिंदवाडा येथे ३.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाची नोंद करण्यात आली होती. मुळात विदर्भ आणि विशेषत: गडचिरोली हे भूकंपप्रवण क्षेत्र नाही.

जबलपूर आणि मेळघाटातील गाविलगड येथील भूकंप केंद्र नागपूरपासून सगळ्यात जवळ आहेत. यातील जबलपूर येथील केंद्र नेहमीच कार्यरत असते. मेळघाटात यापूर्वी १४ मार्च १९३८ रोजी ५.५ रिश्टर स्केलचा सगळ्यात मोठा भूकंप झाला होता. त्याचे धक्के नागपुरातसुद्धा (४ रिश्टर स्केल) जाणवले होते. मात्र, त्यानंतर कोणताही मोठा धक्का बसलेला नाही.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: