NZ vs IND : न्यूझीलंडसमोर भारतीय संघाचे पानीपत; रोहित, विराट, इशान, राहुल झाले फेल…


दुबई : न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाचे पानीपत झाल्याचे पाहायला मिळाले. कारण भारताच्या एकाही फलंदाजाला मोठी खेळी साकारता आली नाही आणि त्यामुळेच त्यांना न्यूझीलंडपुढे विजयासाठी माफक आव्हान ठेवता आले. रोहित शर्माला सलामीला न पाठवता भारताने या सामन्यात मोठी चुक केली आणि त्याचा फटकाही त्यांना बसला. रोहित, विराट कोहली, इशान किशन, लोकेश राहुल हे सर्व फलंदाज या सामन्यात अपयशी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे भारताला या महत्वाच्या सामन्यात न्यूझीलंडपुढे १११ धावांचे माफक आव्हान ठेवता आले.

न्यूझीलंडच्या संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि भारतीय संघाला मोठा धक्का बसला. कारण आतापर्यंत दुबईच्या मैदानात प्रथम गोलंदाजी कणारा संघ १८पैकी १४ सामने जिंकला आहे. त्याचबरोबर भारताला यावेळी सुरुवातीलाच मोठे धक्का बसल्याचे पाहायला मिळाले. भारताने यावेळी फलंदाजीमध्ये मोठे बदल केला आणि त्याचाच फटका संघाला बसल्याचे पाहायला मिळाले. भारताने यावेळी सलामीला रोहित शर्माला न पाठवता इशान किशला संधी देण्याचा प्रयोग केला. पण याचा मोठा फटका भारतीय संघाला बसला. कारण इशान यावेळी चार धावा करून बाद झाला. त्यानंतर लोकेश राहुलही सहाव्या षटकात बाद झाला, राहुलला यावेळी १८ धावा करता आल्या.

रोहितला यावेळी सलामीला न पाठवता तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्यात आले होते. रोहित शर्माला यावेळी पहिल्याच चेंडूवर जीवदान मिळाल्याचे पाहायला मिळाले. ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर मोठा फटका मारण्याच्या नादात चेंडूने रोहितच्या बॅटची कडा घेतली आणि न्यूझीलंडच्या अॅडम मिल्नेला यावेळी झेप पकडण्याची संधी होती. पण मिल्नेला हा झेल पकडता आला नाही आणि रोहितची एकही धाव झालेली नसताना त्याला जीवदान मिळाले. पण रोहितला या जीवदानाचा चांगला फायदा उचलता आला नाही. कारण न्यूझीलंडचा फिरकीपटू इशा सोधीने रोहितला मार्टिन गुप्तिलकरवी झेल बाद केले. रोहितने यावेळी एक चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३४ धावा केल्या. रोहित बाद झाल्यावर संघाची जबाबदारी कर्णधार विराट कोहलीवर होती. पण विराट यावेळी अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाला. कोहलीला यावेळी इश सोधीनेच बाद केले. कोहलीने यावेळी १७ चेंडूंमध्ये फक्त ९ धावा केल्या.
विराट आणि रोहित बाद झाल्यावर रिषभ पंत आणि हार्दिक पंड्या यांच्यावर धावा करण्याची जबाबदारी होती. पण पंत यामध्ये अपयशी ठरला. पंतला यावेळी १२ धावांवर समाधान मानावे लागले आणि भारतीय संघाला पाचवा धक्का बसला. हार्दिक पंड्याने यावेळी २२ धावा केल्या.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: