IND vs NZ : मुंबई इंडियन्सचा हा वेगवान गोलंदाज ठरू शकतो भारताचा कर्दनकाळ, जाणून घ्या कोण आहे तो…


INDvsNZ : दुबई : भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये आज अत्यंत चुरशीचा सामना पाहायला मिळू शकतो. दोन्ही संघांसाठी आजचा सामना महत्वाचा आहे. त्यामुळे सर्वांच्या नजरा या सामन्याकडे लागल्या आहेत. न्यूझीलंडचा दिग्गज फलंदाज रॉस टेलरने आजच्या सामन्याबाबत मोठी प्रतिक्रिया दिली आहे. भारतीय संघाविरुद्धच्या सामन्यात किवी संघ ट्रेंट बोल्टवर अवलंबून राहू शकतो, असे त्याने म्हटले आहे.

रॉस टेलरचा असा विश्वास आहे की, किवी संघ सामन्यावर पकड मिळविण्यासाठी ट्रेंट बोल्टवर अवलंबून राहू शकतात. शाहीन शाह आफ्रिदीने काही दिवसांपूर्वी ज्या प्रकारचे काम केले होते, ट्रेंट बोल्टलाही न्यूझीलंडसाठी तेच काम करावे लागेल. न्यूझीलंडसाठी बोल्ट खूप महत्त्वाचा खेळाडू असेल. किवींनी प्रथम गोलंदाजी केल्यास केन विल्यमसन सलामीच्या विकेट घेण्यासाठी त्यांच्यावर अवलंबून असेल.

टी-२० विश्वचषकात रविवारी संध्याकाळी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सामना होणार आहे. दोन्ही संघांना अव्वल चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी हा महत्त्वाचा सामना ठरणार आहे. पाकिस्तानविरुद्ध खेळताना दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला होता. ट्रेंट बोल्ट या सामन्यात किवी संघासाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

सामन्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेत ट्रेंट बोल्ट म्हणाला होता की, शाहीन शाह आफ्रिदीने भारताविरुद्धच्या सामन्यात ज्या प्रकारची कामगिरी केली, तशीच कामगिरी मला टीम इंडियाविरुद्धही करायला आवडेल.

या पार्श्वभूमीवर भारतीय कर्णधार विराट कोहलीने महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. पत्रकार परिषदेत कोहली म्हणाला की, आम्ही चांगल्या गोलंदाजांच्या विरोधात चांगला खेळ करू. आपण मानसिकता कशी ठेवतो यावर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. जर बोल्ट शाहीनचे अनुकरण करण्यास प्रेरित असेल, तर आम्ही त्याचा प्रतिकार करण्यास प्रेरित आहोत. आम्ही त्याच्याविरुद्ध याआधीही खेळलो आहे.

भारताविरुद्धच्या आतापर्यंतच्या सामन्यांमध्ये ट्रेंट बोल्टने भेदक गोलंदाजी केली आहे. त्यामुळे आजच्या सामन्यातही बोल्टवर सर्वांचे लक्ष लागलेले असेल. बोल्टने आजच्या सामन्याच्या सुरुवातीलाही भारताला धक्के दिले तर हा सामना पाकिस्तानसारखाच होऊ शकतो. त्यामुळे बोल्ट आजच्या सामन्यात कशी कामगिरी करतो, याची उत्सुकता सर्वांनाच असेल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: