कठीण कोरोना काळात भटक्या समाजाचा पोटापाण्याचा प्रश्न मार्गी लावा- भटक्या समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष समाधान गुराळकर

कठीण कोरोना काळात भटक्या समाजाचा पोटापाण्याचा प्रश्न मार्गी लावा- भटक्या समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष समाधान गुराळकर Solve the problem of nomadic community’s livelihood in difficult Corona times – Maharashtra President of Nomadic Society Samadhan Guralkar

बुलडाणा,(प्रतिनिधी) -कोरोनाने महाराष्ट्रामध्ये थैमान घातला आहे .तमाम भटक्या विमुक्तांची आज उपवासमार होत आहे.भटके – विमुक्त पोटाची खळगी भरण्यासाठी महाराष्ट्रभर कापडाचे पाले घेऊन व त्यांचे कुटुंबीय भीक मागतात , आज त्यांना गावात येऊ देत नाहीत . त्यांच्याकडे शेती नाही ,त्यांचा कोणताही उद्योग नाही त्यामुळे कोणी त्यांना उसनवारी देत नाही.अशा कठीण कोरोना काळात भटक्या समाजाचा पोटापाण्याचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी भटक्या समाजाचे महाराष्ट्राचे अध्यक्ष समाधान गुराळकर यांनी युवा स्वाभिमान पार्टीच्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्याकडे युवा स्वाभिमानचे इश्वरसिंग चंदेल यांच्यामार्फत सोशल मिडियाच्या माध्यमातून केली आहे .

शासनाकडून त्यांना अन्नधान्यांची अतिशय गरज आहे.रोडवर येण्याची सुद्धा ताकद त्यांच्यात नाही. पालामध्ये चिमूटभर खाण्याकरता नाही.शासनाने त्यांना अन्नधान्यांची मदत करावी.संपूर्ण महाराष्ट्र भर उपाशीपोटी असलेले मेढगी ,जोशी,डवरी, गोसावी,नाथपंथी,भराडी,वासुदेव नंदीवाले,पांगुळ, गोंधळी,चित्रकथी,काशीकापडी ,मानकर,जोशी व गाडीवाले नाथपंथी,सरोदे जोशी, मसणजोगी असे भटके विमुक्त आहे त्यांच्या जगण्याचा प्रश्न संपवावा. या गरिबांची हाक मुुुुुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोचवावी अशी आर्त हाक भटक्या समाजाचे महाराष्ट्र अध्यक्ष समाधान गुराळकर यांनी अमरावती युवा स्वाभिमान पार्टीच्या खासदार नवनीत राणा यांना युवा स्वाभिमानचे इश्वरसिंग चंदेल यांच्या माध्यमातून केली आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: