‘समीर वानखेडेंना एनसीबीमध्ये आणण्यात फडणवीसांचाच हात’


हायलाइट्स:

  • नवाब मलिकांचा फडणवीसांवर निशाणा
  • देवेंद्र फडणवीसांवर मलिकांचे आरोप
  • समीर वानखेडेंच्या बदलीवर नवाब मलिकांचे बोट

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज पत्रकार परिषद घेत देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यावर धक्कादायक आरोप केले आहेत. तसंच, समीर वानखेडे (sameer wankhede) यांची बदली देखील देवेंद्र फडणवीस यांनीच केली असल्याचा दावा, नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिकांच्या आरोपांनंतर राज्यात मोठी खळबळ माजली आहे.

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणानंतर नवाब मलिक हे सातत्याने समीर वानखेडे यांच्यावर आरोप करत आहेत. या प्रकरणात नवाब मलिकांनी अनेक गौप्यस्फोट केले आहेत. तसंच, समीर वनखेडेंनी खोटी कागदपत्र दाखवल्याचाही आरोप त्यांनी केला होता. या सगळ्या प्रकरणानंतर आता नवाब मलिकांनी आणखी एक धक्कादायक आरोप केला आहे. देवेंद्र फडणवीस यांनीच समीर वानखेडेंची बदली केली, असा दावा नवाब मलिकांनी केला आहे.

वाचाः देवेंद्र फडणवीस हे राज्यातील ड्रग्जच्या खेळाचे मास्टरमाइंड; मलिक यांचा भाजपवर ‘बॉम्बगोळा’

‘समीर वानखेडे गेल्या १४ वर्षांपासून या शहरात वेगवेगळ्या विभागांत काम करत आहेत. एनसीबीमध्ये त्याच्या बदलीमागेही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत. त्यांना यासाठीच आणलं गेलं होतं की त्यांनी पब्लीसीटी करुन निर्दोष लोकांना फसवावं,’ असा आरोप नवाब मलिकांनी केलं आहे.

वाचाः नवाब मलिकांचे खळबळजनक ट्वीट; अमृता फडणवीसांचा फोटो शेअर करत म्हणाले…

‘ड्रग्जचा खेल मुंबई, गोव्यात सुरू राहावा. मोठे मोठे ड्रग्ज पेडलर मग तो काशिफ खान असो किंवा प्रतिक गाभा. त्यांना का सोडलं जातं. ऋषभ सचदेवा, अमिर फर्निचरवाला आणि प्रतिक गाभाला सोडलं जातं. भाजपचे लोक कसे सुटतात,’ असा सवाल नवाब मलिकांनी केला आहे.

वाचाः नवाब मलिकांनी उल्लेख केलेला तो व्यक्ती कोण?; राणेंनी दिलं प्रत्युत्तरSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: