BCCIचा डाव उलटा पडला; वर्ल्डकप सुरु होण्याआधीच टीम इंडियाची पराभवाची तयारी


दुबई: भारतीय क्रिकेट संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकपमधील पहिल्या दोन लढती गमावल्या आहेत. पाकिस्तान पाठोपाठ न्यूझीलंडने भारताचा मोठ्या फरकाने पराभव केला. आता विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली अखेरचा टी-२० वर्ल्डकप खेळणाऱ्या भारतीय संघाचे सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची शक्यता कमी झाली आहे. एखादा चमत्कार भारताला सेमीफायनलमध्ये पोहोचवू शकतो.

वर्ल्डकप सुरू झाला तेव्हा भारत हा विजेतेपदाचा दावेदार होता. पण अनेक वादाच्या पार्श्वभूमीवर भारतीय संघ मैदानात उतरला होता. स्पर्धा सुरू होण्याआधी विराट कोहलीने नेतृत्व सोडणार असल्याचे सांगितले. नव्या प्रशिक्षकाचा शोध, महेंद्र सिंह धोनीचा मेंटर म्हणून अचानक समावेश या सर्व गोंधळात भारताला चांगली सुरुवात मिळाली नाही. जाणून घेऊयात अशा कोणत्या गोष्टी होत्या ज्यामुळे टीम इंडियाला फटका बसला.

१) आयपीएलचा थकवा- भारतीय संघातील सर्व खेळाडू टी-२० वर्ल्डकपच्या आधी आयपीएलमध्ये खेळत होते. त्याच्या आधी काही खेळाडू इंग्लंड दौऱ्यावर तरकाही जण श्रीलंकेच्या दौऱ्यावर होते. आयपीएल खेळल्यानंतर खेळाडू तातडीने वर्ल्डकपच्या तयारीला लागले. त्यामुळे एका पाठोपाठ एक स्पर्धेत चांगली कामगिरी करणे सोपे नाही.

२) विराट कोहलीची घोषणा– भारतीय संघ जेव्हा टी-२० वर्ल्डकपची तयारी करत होता तेव्हा विराट कोहलीने टी-२० क्रिकेटचे नेतृत्व सोडणार असल्याची घोषणा केली. कर्णधार म्हणून त्याची ही शेवटची स्पर्धा आहे. ही गोष्टी भारतीय संघाचे आत्मविश्वास तोडणारी होती.

३) प्रशिक्षक जाण्याच्या मार्गावर- आयपीएल आणि वर्ल्डकपच्या तयारी दरम्यान हे स्पष्ट झाले होते की मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना आणखी कालावधी मिळणार नाही. मोठ्या कालावधीसाठी विराट आणि शास्त्री यांचे संघावर नियंत्रण आहे. दोघांनी अचानक अशा पद्धतीने बाहेर पडल्याने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.

४) धोनीचा अचानक प्रवेश-आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या धोनीला अचानक मेंटर म्हणून भारतीय संघात आणले गेले. हा निर्णय धक्कादायक होता. धोनीचा संघात समावेश करणे यामुळे विराटच्या नेतृत्वावर प्रश्न चिन्ह निर्माण झाले.

५) संघाची निवड डोकेदुखी- जेव्हा टी-२० वर्ल्डकपसाठीच्या संघाची घोषणा झाली तेव्हा युजवेंद्र चहलला संघात स्थान दिले नाही. यामुळे अनेकांना धक्का बसला. आर अश्विनला संघात स्थान दिले गेले. टीम इंडियात असे बदल होताना दिसत होते ज्यावरून विराटची पकड कमी होताना दिसत होती. काही वृत्तानुसार संघ निवडीत रोहित शर्मा आणि धोनीची छाप दिसत होती.

६) स्पर्धा सुरू असताना शोध- एका बाजूला भारतीय संघ वर्ल्डकपची तयारी करत होता. तर दुसऱ्या बाजूला बीसीसीआय नवा कोच, नवा कोचिंग स्टाफ यांचा शोध घेत होता. यामुळे टीममधील वातावरण बिघडले. अशा वातावरणात संघातील एकजूटीवर परिणाम होतो.

७) पाकिस्तान विरुद्धचा पराभव- भारताची पहिली लढत पाकिस्तानविरुद्ध झाली. वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या लढतीत मोठे प्रेशर असते. पण आयपीएलमधून थकलेल्या खेळाडूंना पाकिस्तानविरुद्धच्या लढतीचा अंदाज आला नाही. पहिल्याच सामन्यात १० विकेटनी पराभव झाल्याने संपूर्ण वर्ल्डकप मोहिमेवर त्याचा परिणाम झाला.

८) हार्दिक पंड्याने टेन्शन वाढवले- वर्ल्डकपच्या सुरुवातीपासून हार्दिकचा समावेश भारतासाठी डोकेदुखी ठरला. गोलंदाजी न करणे यामुळे अनेकांनी प्रश्न चिन्ह उपस्थित केले होते. हार्दिक गोलंदाजी करू शकत नसल्याने संघात एका गोलंदाजाची कमी होती. इतक नव्हे त्याची फलंदाजी देखील चांगली झालेली नाही.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: