अहिंसा पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी कोविड सेंटरला दिला एक दिवसाचा पगार

अहिंसा पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांनी कोविड सेंटर ला दिला एक दिवसाचा पगार Employees of Ahimsa Patsanstha paid one day’s salary to covid Center

म्हसवड – म्हसवड ,जि.सातारा येथील नामांकित अहिंसा नागरी सह.पतसंस्थेच्या कर्मचार्‍यांनी आपला एक दिवसाचा पगार जनकल्याण समिती कोविड सेंटर ,म्हसवड यांना अहिंसा नागरी पतसंस्थेचे व्यवस्थापक दिपक मासाळ यांचे हस्ते सुपूर्द केला.

कोरोनासारख्या महामारीने रौद्ररूप धारण केले आहे. यामध्ये म्हसवड व परिसरातील अनेक लोकांना बाधा झाली तर अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.शासकीय सोयी, बेड अपुरे पडू लागल्याने अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले.याचा विचार करून आमदार जयकुमार गोरे भाऊ यांचे विचारातून त्यांचे प्रेरणेने रा.स.संघ व माणगंगा शैक्षणिक संस्था संचलित जनकल्याण कोविड सेंटर ची स्थापना करण्यात आली.

  या कोविड सेंटरमध्ये येणाऱ्या रुग्णांना मोफत उपचार,औषधे व जेवणाची सोय करण्यात आली  आहे . शासनाची कोविड सेंटर कमी पडत असलेने लोकांची गैरसोय दूर व्हावी म्हणून प्रशस्त 50 ऑक्सिजनचे बेड व 50 साधे बेडची सोय उपलब्ध करून दिली आहे.

नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घेतला तर  हे सेंटर आणखी उत्तमरित्या चालवता येईल म्हणून फुल नाही फुलाची पाकळी म्हणून अहिंसा पतसंस्थेतील कर्मचार्‍यांनी एक दिवसाचा पगार देऊन खारीचा वाटा उचलला असून सर्व सेवाभावी संस्थांनी पुढे येऊन यामध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन व माजी नगराध्यक्ष नितिन दोशी यांनी केले.

यावेळी रामचंद्र नरळे,डॉ.मासाळ,अकील काझी, किरण कलढोणे,बंटी खाडे,संजय टाकणे,अर्जुन कांबळे,अतिश भोरे,अर्जुन कांबळे,अमर रोकडे, दादासाहेब माळी,किशोर सराटे,प्रशांत दोशी. पतसंस्था व्यवस्थापक दिपक मासाळ,बाबूभाई मुल्ला सतिश विरकर, प्रशांत आहेरकर, महेश पतंगे,निरज व्होरा,अमजद मुजावर,नितिन वाडेकर ,हरिदास मासाळ व सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: