विराटने खेळाडूंसोबत अस करायल नको होत; वर्ल्डकपमध्ये केली मोठी चूक


दुबई: आयसीसी टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय क्रिकेट संघाने सलग दोन सामने गमावल्यामुळे त्याचे स्पर्धेतील आव्हान जवळ जवळ संपुष्टात आले आहे. सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला पुढील ३ लढती जिंकाव्या लागतील. त्याच बरोबर अन्य संघांच्या निकालावर अवलंबून रहावे लागले. भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीच्या निर्णयावर याआधी अनेकदा टीका झाली आहे. यावेळी त्याने असा निर्णय घेतला ज्यामुळे विराटवर भविष्यात देखील टीका होत राहिल.

वाचा-जिंकणार तरी कसे? दोन सामन्यात फक्त २ विकेट घेतल्या

भारतीय संघाला आयसीसी वर्ल्डकप स्पर्धेत कधीच पाकिस्तानकडून पराभव स्विकारावा लागला नव्हता. पण विराटच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाचा प्रथमच पराभव झाला. भारतीय चाहत्यांसाठी तो मोठा धक्का होता. त्यानंतर न्यूझीलंडने देखील टीम इंडियाचा पराभव केला. पाकिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर भारतासाठी न्यूझीलंडविरुद्धची मॅच करो वा मरो अशी होती. या सामन्यात भारताने अनेक बदल आणि प्रयोग केले. अनेक दिग्गज माजी खेळाडूंच्या मते भारतीय संघाने अंतिम ११ संघात बदल नको करायला हवे होते. जर कर्णधाराने असे केले असेल तर किमान त्याने सलामीची जोडी इतक्या मोठ्या सामन्यात बदलायला नको होती.

वाचा- BCCIचा डाव उलटा पडला; वर्ल्डकप सुरु होण्याआधीच टीम इंडियाची पराभवाची तयारी

भारताचा माजी ऑलराउंडर इरफान पठाणने देखील या गोष्टीवर अश्चर्य व्यक्त केले. अशा मोठ्या स्पर्धेत तुम्ही प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करू शकत नाही. फक्त एक मॅच खेळल्यानंतर तुमच्या मर्जीनुसार संघात बदल करणे चुकीचे आहे. खेळाडूंना लयीमध्ये येण्यासाठी वेळ द्यावा लागतो. मला या गोष्टीने धक्का बसला आहे की संघातील बदल हे चांगल्या खेळाडूंसोबत केले गेले, असे पठाण म्हणाला.

पाकिस्तानविरुद्ध पराभव झाल्यानंतर भारतीय संघाने संघात दोन बदल केले होते. सूर्यकुमार यादवच्या जागी इशान किशन तर भुवनेश्वर कुमारच्या जागी शार्दूल ठाकूरला संधी दिली गेली. सलामीवीर म्हणून रोहितच्या जागी इशानला पाठवण्यात आले. पण त्याचा काही फायदा झाला नाही.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: