Video : भारताच्या पराभवानंतर वसीम अक्रम-वहाबचा डान्स; आफ्रिदी-अख्तरनेही काढले चिमटे


दुबई : टी-२० विश्वचषक २०२१ च्या पहिल्या दोन सामन्यांमध्ये अत्यंत खराब कामगिरी केल्यामुळे टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले आहे. पाकिस्तानकडून १० गडी राखून पराभूत झालेल्या टीम इंडियाला रविवारी न्यूझीलंडकडूनही ८ विकेटने पराभव पत्करावा लागला. न्यूझीलंडविरुद्धही भारतीय फलंदाजी फ्लॉप ठरली आणि संघाने फक्त ११० धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने अवघे २ गडी गमावून लक्ष्य गाठले. भारताच्या पराभवामुळे देशातील क्रिकेट चाहत्यांमध्ये निराशा पसरली आहे, तर दुसरीकडे पाकिस्तानमध्ये जल्लोष साजरा केला जात आहे. टीम इंडियाच्या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी कर्णधार वसीम अक्रम, वकार युनूस यांनी जोरदार डान्स केला. तर शाहिद आफ्रिदीनेही टीम इंडियाच्या पराभवानंतर जखमेवर मीठ चोळले.

वाचा- पराभवानंतर विराटच्या कुटुंबियांना धमकी; या खेळाडूचा धक्कादायक दावा

टीम इंडियाच्या पराभवानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये वसीम अक्रम, वकार युनूस, मिसबाह-उल-हक आणि वहाब रियाझ नाचताना दिसत आहेत. हे सर्व आजी-माजी खेळाडू पाकिस्तान स्पोर्ट्स चॅनलच्या स्टुडिओमध्ये बसून एका गाण्यावर डान्स करत आहेत. न्यूझीलंडच्या विजयानंतर लगेचच पाकिस्तानी क्रिकेटपटूंनी अशाप्रकारे आनंद साजरा केला.

वाचा- जिंकणार तरी कसे? दोन सामन्यात फक्त २ विकेट घेतल्या

शाहिद आफ्रिदीने जखमांवर मीठ चोळले
भारताच्या पराभवानंतर शाहिद आफ्रिदीनेही ट्विट करत टीम इंडियाला डिवचले आहे. आफ्रिदीने ट्विटमध्ये लिहिले आहे की, टीम इंडियाकडे अजूनही सेमीफायनलमध्ये पोहोचण्याची एक संधी आहे, पण पहिल्या दोन मोठ्या सामन्यांमध्ये ज्या प्रकारे खेळ केला आहे, त्यांना उपांत्य फेरीत पाहणं हे एखाद्या चमत्कारासारखं असेल.

वाचा- BCCIचा डाव उलटा पडला; वर्ल्डकप सुरु होण्याआधीच टीम इंडियाची पराभवाची तयारी

भारताच्या पराभवानंतर शोएब अख्तरनेही एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये त्याने म्हटले आहे की, नाणेफेक हरल्याबरोबरच टीम इंडियाचा पराभव निश्चित झाला होता. टीम इंडियाने खूप वाईट क्रिकेट खेळले. संघ अजिबात लयीत दिसत नव्हता. खेळाडू खूप दडपणाखाली असल्याचे दिसत होते. दोन संघ मैदानात आहेत, याची मला कल्पना नव्हती. एकच संघ खेळतोय असं वाटत होतं.

वाचा- विराटने खेळाडूंसोबत अस करायल नको होत; वर्ल्डकपमध्ये केली मोठी चूक

भारतीय संघ पहिल्या दोन सामने गमावल्यानंतर उपांत्य फेरीच्या शर्यतीतून जवळपास बाहेर पडला आहे. दुसरीकडे पाकिस्तानने तिन्ही साखळी सामने जिंकून जवळपास उपांत्य फेरीचे तिकीट पक्के केले आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: