कोरोनाचे लवकर निदान हाच कोरोनाला हरवण्याचा मंत्र आहे – डॉ.अंधारे
कोरोनाचे लवकर निदान हाच कोरोनाला हरवण्याचा मंत्र आहे – डॉ.अंधारे Early diagnosis of corona is the mantra to defeat corona – Dr.Andhare

कुर्डूवाडी / राहुल धोका – सोलापूर जिल्ह्यात कोरोना रोग निदान करणारे डॉक्टर असा परिचय असलेले डॉ.संजय अंधारे यांच्याशी प्रतिनिधीने दुसऱ्या लाटेविषयी माहितीसाठी संपर्क केला होता.

डॉ संजय अंधारे यांचे बार्शी येथील सुश्रृत हॉस्पिटल येथे निमोनिया व सारी आजाराचे निदान होत असताना २७ मे २०२० ला बार्शीत प्रथम कोरोना संक्रमित रुग्ण आढळला. त्यानंतर दोन दिवसांनी आणखीन ५ रुग्ण कोरोना संक्रमित आढळले. त्यांना कोठे उपचारासाठी पाठवायचे हा यक्ष प्रश्न उभा होता. उपचारासाठी यंत्रणा नसल्याने अखेर माजी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.संतोष जोगधन ,डॉ अशोक ढगे तालुका वैद्यकीय अधिकारी , मेडीकल सुप्रीडेंटन डॉ शीतल भोपलकर यांनी डॉ.अंधारे यांनाच त्यांच्यावर उपचाराची विनंती केली, त्या वेळेस हॉस्पिटला कोविड रुग्णालयाची मान्यता नव्हती परंतु कोणत्याही डॉक्टरचे प्रथम कर्तव्य हे रुग्णाचे प्राण वाचवणे आहे त्यामुळे डॉ.अंधारे यासाठी तयार झाले.
जिल्हाधिकारी यांनी तात्काळ २ जुलै २०२० ला सुश्रुतला कोविड रुग्णालयाची मान्यता दिली. रुग्णालयातील एक वार्ड कोरोना रुग्णासाठी राखीव ठेवला पण दहा दिवसात संपूर्ण रुग्णालय कोविड रुग्णांनी भरले होते. आरसीएमआर च्या मार्गदर्शनानुसार उपचार सुरु होते.आजपर्यंत दोन हजार पेक्षा अधिक रुग्ण या रुग्णालयात उपचार घेऊन बरे झाले आहेत. पहिल्या लाटेत ८० % रुग्ण माईल्ड होते. त्यांना हॉस्पिटलची जादा गरज भासत नव्हती पण दुसरी लाट ही वेगळी आहे. लवकर तपासणी करून निदान करणे हाच रुग्ण वाचवण्यासाठी महत्वाचा मंत्र आहे .त्याचप्रमाणे ऑक्सिजन वाढवण्यासाठी पोटावर झोपण्याचा उपायही त्यांनी सांगितला. रुग्ण तत्काळ पोटावर झोपत नाहीत पण ५-१० मिनटानंतर सवय होते यात ४ ते ५ % ऑक्सिजन वाढतो असेही त्यांनी सांगितले.
९४ % पेक्षा कमी ऑक्सिजन ,अन्य रोगांनी ग्रस्त आणि वयानुसार हॉस्पिटलमध्ये अँडमिट होणे गरजेचे होते परंतु दुसऱ्या लाटेत या विषयी नवीन डाटा गोळा करावा लागणार आहे .प्लझ्मा चा उपयोग अगदी अंतिम टप्यात केला जातो पण तो पेशंट अँडमिट केल्यानंतर ३-४ दिवसात होणे गरजेचे आहे .रेमडेसिवीर इंजेक्शन्स बाबतीतही पेशंटची स्थिती पाहून ती क्रिटीकल होणेपूर्वी वापर आवश्यक आहे. खरे तर कोरोनामध्ये रेमडेसिवीर इंजक्शन हिरोच्या भूमिकेत आहे पण तोच हरपला आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
दुसऱ्या लाटेत बेडची संख्या डबल झाली आहे तरीही बेड मिळत नाहीत याच कारण नवीन प्रकारामुळे पेशंट मोठ्या प्रमाणात हॉस्पिटलमध्ये दाखल होत आहेत. मृत्यूदर यावेळी अधिक असल्याचे त्यांनी सांगितले. पहिल्या लाटेनंतर कोरोना संपला असे वाटले परंतु हि मोठी चूक ठरली अशी माहिती त्यांनी दिली.कोरोनाचे लवकर निदान हाच कोरोनाला हरवण्याचा मंत्र आहे तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना पाळून कोरोनाला रोखण्यात यश मिळवले पाहिजे असे मत व्यक्त केले.
स्वत: प्रतिनिधीनी त्यांच्याकडे उपचार घेतले आहेत.अनेक रुग्ण वाचल्यानंतर ते डाँक्टरांना देवरूप मानून पत्र लिहतात अनेकांना जीवदान देणारे डॉ.संजय अंधारे यांचे ऋणातून त्यांची हि मुलखात घेण्याचा हा एक योग प्राप्त झाला याचा आनंद होत आहे.