आता ‘मुंबई हाय’चे खासगीकरण; पेट्रोलियम मंत्रालयाचे ओएनजीसीला पत्र, दिले ‘हे’ निर्देश


हायलाइट्स:

  • १९७४ मध्ये ‘मुंबई हाय’ या तेलसाठ्यांचा शोध लागला.
  • ‘मुंबई हाय’ हे अरबी समुद्रात १७६ कि.मी. पश्चिमेस असलेले नैसर्गिक तैलक्षेत्र आहे.
  • ‘मुंबई हाय’चे परिचालन ‘ओएनजीसी’कडून केले जाते.

नवी दिल्ली : मुंबईपासून खोल समुद्रात असलेल्या ‘ओएनजीसी‘च्या अखत्यारितील ‘मुंबई हाय‘ या खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन घेणाऱ्या तेल क्षेत्राचे खासगीकरण करण्याचा घाट केंद्र सरकारने घातला आहे. उत्पादन कमी होत असल्याचा ठपका ठेवत पेट्रोलियम मंत्रालयाने ‘ओएनजीसी’ला या संदर्भात पत्र पाठवलं आहे. ज्यात ६० टक्के हिस्सेदारी परदेशी कंपनीला देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

पेन्शनधारकांसाठी खूशखबर; लाइफ सर्टिफिकेटबाबत ‘एसबीआय’ने सुरु केली ‘ही’ सुविधा
‘मुंबई हाय’ हे अरबी समुद्रात मुंबईपासून १७६ कि.मी. पश्चिमेस असलेले नैसर्गिक तैलक्षेत्र आहे. ‘मुंबई हाय’चे परिचालन ‘ओएनजीसी’कडून केले जाते. दरम्यान, या येथून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने या तेल क्षेत्राचे खासगीकरण करण्याचा विचार केंद्र सरकारने केला आहे. त्याबाबत २८ ऑक्टोबर २०२१ रोजी पेट्रोलियम मंत्रालयातील अतिरिक्त सचिव अमर नाथ यांनी ‘ओएनजीसी’चे अध्यक्ष सुभाष कुमार यांना पत्र पाठवले आहे. यात ‘ओएनजीसी’ने ‘मुंबई हाय’मधील ६० टक्के हिस्सा आणि नियंत्रणाचे अधिकार परदेशी कंपनीकडे सुपूर्द करावेत, असे निर्देश देण्यात आले आहेट. पीटीआय या संस्थेने यासंदर्भात वृत्त प्रकाशित केले आहे.

अर्थव्यवस्था सुस्साट; ऑक्टोबर महिन्यात जीएसटी महसुलात विक्रमी वाढ
तीन पानी पत्रात अतिरिक्त सचिव अमर नाथ म्हणतात की, मुंबई हाय आणि वसई सॅटेलाईटमधील उत्पादन क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे अंतरराष्ट्रीय भागिदारांना येथे गुंतवणुकीसाठी आमंत्रित करायला हवे आणि त्यांना ६० टक्के हिस्सा आणि परिचालनाचे अधिकार द्यायला हवेत, असे म्हटलं आहे.

आरोग्य विमा खरेदी करताना निष्काळजीपणा नकोच; या ३ मार्गांनी वाढवा विमा संरक्षण
विशेष म्हणजे सुमार कामगिरीबद्दल नाथ यांनी दुसऱ्यांदा ‘ओएनजीसी’च्या व्यवस्थापनाला पत्र दिले आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात नाथ यांनी ‘ओएनजीसी’ला पत्र दिले होते. सातत्याने उत्पादनात घट होत असल्याने ‘मुंबई हाय’चा पुनर्विकासाचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. ‘मुंबई हाय’मधील उत्पादन २८ ते ३२ टक्क्यांच्या दरम्यान आहे, जे क्षमेतेपेक्षा कमी आहे.

उत्साही सुरूवात ; सेन्सेक्स निफ्टी पुन्हा तेजीच्या वाटेवर, दोन्ही निर्देशांकांची भरपाई
या तेल क्षेत्राची प्रचंड क्षमता आहे जी स्थानिक मागणी पूर्ण करण्यास मोठं योगदान देऊ शकते, असे नाथ यांनी म्हटलं आहे. मात्र या ठिकाणी असलेल्या पाईपलाईन्स आणि ऑइल प्लॅटफॉर्म काळाच्या ओघात जीर्ण झाले आहेत. वयोमानानुसार त्यात गळती होत असून ते तातडीने बदली करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी पत्रात म्हटलं आहे. ‘ओएनजीसी’ने अनुभवी परदेशी कंपनीला भागीदार करून घ्यावे, असे सुचवण्यात आले आहे. ‘ओएनजीसी’च्या कामात सुधारणा करण्यासाठी नाथ या सात मुद्दे असणारा कृती आराखडा देखील कुमार यांच्याकडे सादर केला आहे.

१९७४ मध्ये ‘मुंबई हाय’ या तेलसाठ्यांचा शोध लागला. पुढे वसई आणि सॅटेलाईटमधून १९८८ पासून उत्पादन सुरु करण्यात आले. केंद्रातील मोदी सरकारच्या नेतृत्वात ‘ओएनजीसी’ने स्वतःकडील तेल विहीरी आणि तेल क्षेत्रांचे खासगीकरण करावे, यासाठी पेट्रोलियम मंत्रालयाने तिसऱ्यांदा प्रयत्न केला आहे. ‘ओएनजीसी’कडून उत्पादन होणाऱ्या खनिज तेल आणि नैसर्गिक वायूमध्ये ‘मुंबई हाय’चे मोठे योगदान आहे. ‘मुंबई हाय’चे खासगीकरण झाल्यास ‘ओएनजीसी’कडे छोट्या तेल विहिरी आणि काही मोजके तेल साठे शिल्लक राहतील.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: