पराभवानंतर विराटने फिरवली पाठ; पत्रकार परिषदेत उघडी पडली टीम इंडिया


दुबई: टी-२० वर्ल्डकपमध्ये भारताला सलग दोन पराभवाचा सामना करावा लागला. पाकिस्तान पाठोपाठ न्यूझीलंडकडून भारत पराभूत झाला. या दोन पराभवामुळे चाहते नाराज झालेत. न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली पत्रकार परिषदेत आला नाही. त्याच्या जागी जलद गोलंदाज जसप्रीत बुमराहने पत्रकारांची उत्तरे दिली.

वाचा- विराट तुला याचे उत्तर द्यावे लागले; पाहा कोणी विचारला प्रश्न

आयसीसीच्या कोणत्याही स्पर्धांमध्ये सामना झाल्यानंतर शक्यतो संघाचा कर्णधार पत्रकार परिषदेला सामोरे जातो. अर्थात संघातील अन्य कोणताही खेळाडू उपस्थित राहू शकतो. न्यूझीलंडविरुद्धच्या पराभवानंतर विराटच्या जागी बुमराहने पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली.

वाचा- विराटने खेळाडूंसोबत अस करायल नको होत; वर्ल्डकपमध्ये केली मोठी चूक

भारताच्या फलंदाजीबद्दल बोलताना तो म्हणाला, दवाचा फॅक्टर असल्यामुळे आम्ही सुरुवातीपासून अधिक धावा करण्याचा प्रयत्न केला. आम्हाला २०-२५ अधिक धावा करायच्या होत्या. त्यामुळेच मोठे शॉट खेळले. प्रत्येक खेळाडूला जय-पराजयाला सामोरे जावे लागते. विजय मिळाल्यावर अधिक आनंदी न होणे आणि पराभूत झाल्यावर अधिक दु:खी न होण्याचा आमचा प्रयत्न असतो. बुमराहने टॉसची भूमिका महत्त्वाची होती असेही सांगितले. डावाच्या सुरूवातीला मोठे शॉट खेळले. पण सीमा रेषा मोठी असल्याने त्यात यश आले नाही.

वाचा-केविन पीटरसननं दिला भारतीय खेळाडूंना आधार; हिंदी भाषेत ट्विट करून म्हणाला…

आयपीएल आणि टी-२० वर्ल्डकप बद्दल विचारले असता, बुमराह म्हणाला, नक्कीच तुम्हाला ब्रेकची गरज असते. मोठ्या कालावधीसाठी बायो बबलमध्ये थांबणे. कुटुंबापासून दूर राहणे या गोष्टी खेळाडूंच्या डोक्यात राहतात. जेव्हा तुम्ही मैदानात असतात तेव्हा या गोष्टी लक्षात येत नाहीत. पण सध्या जी परिस्थिती आहे. त्यात या गोष्टी शक्य नाहीत. जैव सुरक्षित वातावरणात आम्ही सुरक्षित आहोत. मात्र या सुरक्षित वातावरणात थकवा आणि मानिसक थकवा याचा कामगिरीवर परिणाम होतो. आम्ही सातत्याने एकच गोष्ट करत आहोत. त्यामुळे तुम्ही अनेक गोष्टी नियंत्रणात ठेवू शकत नाही.

वाचा- BCCIचा डाव उलटा पडला; वर्ल्डकप सुरु होण्याआधीच टीम इंडियाची पराभवाची तयारी

भारतीय संघ जूनपासून बायो बबलमध्ये आहे. न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर भारताला ३ आठवड्यांचा ब्रेक मिळाला होता. त्यानंतर इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची मालिका खेळली होती. विराट कोहलीने पाकिस्तान आणि न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात सहा दिवसांचे अंतर ठेवल्याचा फायदा होईल असे म्हटले होते. पण रविवारी टॉसच्या वेळी त्याने उलट वक्तव्य केले होते.

एकूणच बुमराह आणि कर्णधार विराट यांच्या वक्तव्यात अंतर असल्याचे दिसते. भारतीय संघात संवाद नीट नसल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे त्याचे उत्तर पत्रकार परिषदेतून मिळाले. बुमराह खराब कामगिरीचा बचाव करण्याचा प्रयत्न करत होता.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: