तुम्हाला काय सिद्ध करायचे आहे, की रोहित शर्मा…; सुनील गावसकर संतापले


दुबई: भारताचे माजी कर्णधार सुनील गावसकर आणि माजी ऑलराउंडर मदन लाल यांनी भारतीय संघाच्या न्यूझीलंडविरुद्धच्या रणनितीवर जोरदार हल्ला चढवला आहे. भारतासाठी महत्त्वाच्या या सामन्यात न्यूझीलंडने ८ विकेटनी विजय मिळवला आणि टीम इंडियाचे आव्हान जवळ जवळ संपुष्टात आणले. भारताच्या या पराभवानंतर पाहा हे माजी खेळाडूंनी काय म्हणाले…

वाचा- BCCIचा डाव उलटा पडला; वर्ल्डकप सुरु होण्याआधीच टीम इंडियाची पराभवाची तयारी

न्यूझीलंडविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात रोहित शर्माला तिसऱ्या क्रमांकावर आणि केएल राहुल आणि इशान किशन यांना सलामीला पाठवण्याची रणनिती समजण्याच्या पलीकडची आहे. भारताने नाणेफेक गमावली त्यानंतर २० षटकात फक्त ११० धावा केल्या. न्यूझीलंडने विजयाचे लक्ष्य फक्त १४. ३ षटकात पार केले. भारतीय संघाने या दोन्ही सामन्यात अधिक हुशारी दाखवली. जर तुम्ही धावा केल्या नाही तर विजयाची संधी कमी होत जाते. ११० धावांचा बचाव तेव्हाच केला जाऊ शकतो जेव्हा चमत्कार घडतो. दोन्ही सामन्यात भारताचा वाईट पराभव झालाय, असे मदन लाल म्हणाले.

वाचा- विराट तुला याचे उत्तर द्यावे लागले; पाहा कोणी विचारला प्रश्न

टी-२० क्रिकेटमध्ये एकदा तुम्ही मागे पडला की कमबॅक करणे अवघड जाते ठरते. फलंदाजीच्या क्रमात बदल करण्याचा निर्णय एकट्या विराटचा असणार नाही. यात संघव्यवस्थापन, धोनी आणि शास्त्री यांचा सहभाग असेल असे ते म्हणाले.

वाचा- विराटने खेळाडूंसोबत अस करायल नको होत; वर्ल्डकपमध्ये केली मोठी चूक

इशान किशन सारख्या युवा खेळाडूला डावाची सुरूवात करण्याची जबाबदारी देऊ नये. त्याने ८ चेंडूत ४ धावा केल्या. मला कारण माहिती नाही. पण अपयशी ठरण्याची भिती होती म्हणून फलंदाजीच्या क्रमात बदल केला. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. रोहित शर्मा जबरदस्त खेळाडू आहे आणि तुम्ही त्याला तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला पाठवता. विराटने तिसऱ्या क्रमांकावर किती धावा केल्या आहेत. मात्र तो चौथ्या क्रमांकावर आला, असे गावसकर म्हणाले.

वाचा- केविन पीटरसननं दिला भारतीय खेळाडूंना आधार; हिंदी भाषेत ट्विट करून म्हणाला…

इशान किशन हे हीट किंवा मिस खेळाडू आहे. अशा फलंदाजाला चौथ्या किंवा पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी पाठवावे. सामन्याच्या परिस्थितीनुसार तो खेळू शकतो. पण तुम्ही काय केले? रोहितला असे सांगितले की आमचा तुझ्यावर विश्वास नाही. कारण तु ट्रेंट बोल्ट या डाव्या हाताने गोलंदाजी करणाऱ्याला खेळू शकत नाहीत. जेव्हा तुम्ही इतकी वर्ष सलामीला खेळणाऱ्या खेळाडूला असे बोलता तेव्हा तुम्ही त्याच्या क्षमतेवर प्रश्न उपस्थित करता. जर इशानने ७० धावा केल्या असत्या तर आम्ही त्याचे कौतुक केले असते. पण तो अपयशी ठरला तर टीका होणारच, असेही गावसकरांनी स्पष्ट केले.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: