धक्कादायक! करोना काळात देशात दररोज ३१ मुलांच्या आत्महत्या


वृत्तसंस्था, नवी दिल्ली :

करोनानाळात जगभरात माणसांच्या आयुष्याची अनेक पातळ्यांवर पडझड झाली. त्यातून लहान मुलेही सुटली नाहीत. मुलांच्या भावविश्वावर या काळात मोठे आघात झाले असून, सन २०२० मध्ये देशात दररोज तब्बल ३१ मुलांनी आत्महत्या केल्याचे धक्कादायक वास्तव सरकारी आकडेवारीमधून समोर आले आहे. या काळात मुले प्रचंड मानसिक तणावातून गेल्याचे यातून अधोरेखित होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या आकडेवारीनुसार २०२० मध्ये ११,३९६ मुलांनी आत्महत्या केल्या. २०१९ मध्ये अशा ९,६१३ घटना घडल्या होत्या. त्यात गेल्या वर्षी १८ टक्के वाढ झाली. तर २०१८मध्ये ९,४१३ घटना घडल्या होत्या, त्यात २१ टक्क्यांनी वाढ झाल्याची नोंद आहे. कौटुंबिक समस्या (४,००६), प्रेम प्रकरण (१,३३७) आणि आजार (१,३२७) ही १८ वर्षांखालील मुलांच्या आत्महत्यांची मुख्य कारणे होती. काही मुलांच्या आत्महत्येमागे वैचारिक कारणे, व्यक्तिपूजा, बेरोजगारी, दिवाळखोरी, नपुंसकता किंवा वंध्यत्व आणि अमली पदार्थांचे सेवन ही इतर कारणेही नोंदवली गेली आहेत.

Uttar Pradesh: देशातील ४६ रेल्वे स्टेशन्स बॉम्बस्फोटात उडवण्याची धमकी, अलर्ट जारी
Munawar Faruqui: तीनदा सीम बदललं, धमक्या रोजच्याच : कॉमेडीयन मुनव्वर फारुकी

मानसिक आरोग्याशी निगडित गैरसमज आणि दरडोई मानसिक आरोग्य व्यावसायिकांची अत्यंत तोकडी संख्या याकडे तातडीने लक्ष देण्याची गरज आहे. मुले आणि तरुणांसाठी सुयोग्य परिसंस्था निर्माण करण्यासाठी सामूहिक कृतीची आवश्यकता आहे.

सेव्ह द चिल्ड्रेन संस्था

करोना प्रादुर्भावामुळे शाळा बंद पडणे, एकटेपणा आणि मोठ्यांबाबतच्या चिंतेमुळे मानसिक आरोग्याच्या प्रश्नाने गंभीर स्वरूप धारण केल्याचे ‘सेव्ह द चिल्ड्रेन’चे बाल संरक्षण उपसंचालक प्रभात कुमार यांनी सांगितले. एक समाज म्हणून मनुष्यबळ उभारणीसाठी आवश्यक असलेल्या शिक्षण आणि शारीरिक आरोग्य यांसारख्या गोष्टींबद्दल आपल्याला जाणीव असते. तरीही भावनिक मानसिक आरोग्यासाठी सामाजिक पाठबळ अनेकदा कमी पडते. मुलांमधील आत्महत्यांची वाढती संख्या यंत्रणेचे अपयश दर्शवते. मुलांना त्यांच्या क्षमतांची जाणीव करून देण्यासाठी आणि उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी अनुकूल परिसंस्था प्रदान करणे ही पालक, कुटुंबे, समाज आणि सरकार यांची सामूहिक जबाबदारी आहे. त्याउलट आत्महत्या करणे हा विरोधाभास आहे, असे कुमार यांनी सांगितले.

PM Narendra Modi: लसीकरण ५० टक्क्यांहून कमी, पंतप्रधान मोदींची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक
UP Elections: …तर तालिबानविरुद्ध एअरस्ट्राईक निश्चित, योगींनी भरला दमSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *