Ashish Shelar: परमबीर सिंग गायब होण्यामागे कोण?; भाजपनं मांडली ‘ही’ थिअरी


हायलाइट्स:

  • भाजप नेते आशिष शेलार यांनी घेतली पत्रकार परिषद
  • परमबीर सिंग गायब होण्यामागे ठाकरे सरकार – शेलार
  • परमबीर सापडल्यास ठाकरे सरकारचं पितळ उघडं पडेल – शेलार

मुंबई: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणीचे आरोप करून राज्य सरकारला अडचणीत आणणारे व सध्या गायब असलेले मुंबईच माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांच्या ठावठिकाण्यावरून महाविकास आघाडी सरकार व भाजपमध्ये जुंपली आहे. परमबीर सिंग यांना पळून जाऊ देण्यामागे ठाकरे सरकारच आहे. यामागे मोठे कटकारस्थान आहे,’ असा गंभीर आरोप भाजपनं (BJP) केला आहे.

वाचा: इतरांच्या आयाबहिणी महिला नाहीत का?; नवाब मलिकांचा फडणवीसांना बोचरा सवाल

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत परमबीर यांचा उल्लेख करत थेट केंद्र सरकारवर आरोप केले होते. परमबीर रस्ते मार्गे विदेशात गेला असेल तर ज्या राज्यांतून जाऊ शकतो, त्या राज्यात भाजपची सरकारं आहेत, याकडंही त्यांनी लक्ष वेधलं होतं. नवाब मलिक यांचा आरोप भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी खोडून काढला आहे. ‘नवाब मलिक हे कपोलकल्पित आरोप करत आहेत. मुळात परमबीर सिंग याचं घर महाराष्ट्रात आहे. रेशन कार्ड, आधार कार्ड महाराष्ट्रातील आहे. मग तो महाराष्ट्रातून पळून कसा गेला, याच उत्तर राज्यातील सरकारनं द्यायला हवं. महाराष्ट्रात अशी कुठली एजन्सी आहे आणि असे कोण लोक आहेत, जे परमबीर यांना मदत करतायत. परमबीरच्या मार्फत राज्य सरकारनं अशा कुठल्या कारवाया केल्या आहेत की राज्याचे मुख्यमंत्री किंवा अन्य कोणताही मंत्री त्याच्याबद्दल तोंड उघडत नाही. परमबीर सिंग हा महाराष्ट्र सरकारचा जावई असल्यासारखं वर्तन का केलं जातंय,’ असा सवाल शेलार यांनी केला.

वाचा: ‘समीर वानखेडे हे नरेंद्र मोदींच्याही पुढं निघून गेलेत; त्यांचे फोटो बघा’

‘परमबीर सिंगची मालमत्ता जप्त का केली गेली नाही? लूकआउट नोटीसला उशीर का झाला? परमबीर पळून जाईपर्यंत राज्य सरकारनं वाट का पाहिली? अशा कोणत्या गोष्टी ठाकरे सरकारनं परमबीर सिंगकडून करून घेतल्यात, ज्या उघड झाल्या असत्या तर अडचण झाली असती. परमबीर पळून गेलाच असेल तर त्यास महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे. परमबीर सिंगकडे या सरकार विरोधात बरीच माहिती आहे. तो सापडला तर सरकारचं पितळ उघडं पडेल, त्यामुळंच सरकार त्याला पळायला मदत करतंय. हा एक मोठा डाव आहे, असा दावा शेलार यांनी केला. विदेशात त्यांना राजकीय आश्रय मिळावा यासाठीही ठाकरे सरकार प्रयत्न करत असावं,’ अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली.

वाचा: मी ‘तो’ पंचनामा दाखवतो, फडणवीसांनी माफी मागावी: नवाब मलिकSource link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: