पेपरलेस डिजिटल कर्ज ; डीएमआय फायनान्सची रिलायन्स रिटेलसोबत भागीदारी


हायलाइट्स:

  • DMI रिलायन्स रिटेलच्या कन्झुमर इलेक्ट्रॉनिक विकत घेणाऱ्या ग्राहकांना वित्तपुरवठा उपलब्ध करेल.
  • यासाठी कंपनीने रिलायन्स रिटेल लिमिटेड सोबत भागीदारी केली आहे.
  • संपूर्ण पेपरलेस प्रक्रिया असून यात लवचिक आणि परवडणारे EMI पर्याय प्रदान करेल.

मुंबई :डीएमआय फायनान्स प्रायव्हेट लिमिटेडने (DMI) रिलायन्स रिटेलच्या कन्झुमर इलेक्ट्रॉनिक्स विकत घेणाऱ्या ग्राहकांना डिजिटल फायनान्स पर्याय पुरवण्यासाठी रिलायन्स रिटेल लिमिटेड सोबत भागीदारीची घोषणा केली. यामध्ये ग्राहकांना डीएमआय फायनान्स तात्काळ डिजिटल कर्ज उपलब्ध केले जाणार आहे.

मुहूर्त ट्रेडिंग करताय ; जाणून घ्या मुहूर्त ट्रेडिंगचे महत्व आणि यंदाची मुहूर्ताची वेळ
संपूर्णपणे पेपरलेस डिजिटल प्रक्रियेद्वारे, DMI संपूर्ण भारतातील व्यापारी स्थानांवर रिलायन्स रिटेलच्या कनझूमर इलेक्ट्रॉनिक विकत घेणाऱ्या ग्राहकांना वित्तपुरवठा उपाय ऑफर करेल. ही भागीदारी रिलायन्सद्वारे नव्याने लाँच केलेल्या JioPhone Next साठी कर्जासह सुरू होईल. ही परिवर्तनात्मक भागीदारी सर्व रिलायन्स रिटेल ग्राहकांना संपूर्ण पेपरलेस प्रक्रिया देऊ करते जी त्वरित, लवचिक आणि परवडणारे EMI पर्याय प्रदान करेल. JioPhone Next साठी कर्जाची मुदत १८ आणि २४ महिन्यांसाठी असेल.

मुहूर्ताला सोनं झालं स्वस्त! जाणून घ्या आजचा सोने चांदीचा भाव
या प्रसंगी बोलताना डीएमआयचे प्रवक्ते म्हणाले, “आजच्या जगात स्मार्टफोन हे ग्राहक उत्पादन आणि आर्थिक समावेशाचे साधन आहे. DMI वर, JioPhone Next पासून सुरू होणार्‍या कनझूमर इलेक्ट्रॉनिक्सच्या श्रेणीसाठी वित्तपुरवठा करण्यासाठी रिलायन्स रिटेलसोबत भागीदारी केल्याचा आनंद आहे. ह्या भागीदारीमुळे लाखो भारतीयांना डेटा लाइफला प्रवेश मिळणे शक्य होईल आणि त्यांचे अधिक समृद्ध भविष्याचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने त्यांना एक पाऊल पुढे घेऊन जाईल.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: