खत दरवाढी विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक

खत दरवाढी विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक Swabhimani Shetkari Sanghatana aggressive against fertilizer price hike

पंढरपूर ,18/05/2021- खत दरवाढी विरोधात माजी खासदार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. या आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी घेण्यात आलेली राज्य कार्यकारणीची ऑनलाईन बैठक संपन्न झाली.

   वाढत्या खत दराविरोधात गुरुवार दिनांक 20 रोजी सकाळी 11.00 वाजता केंद्र सरकारच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन प्रत्येक गावामध्ये, घरासमोर, शिवारामध्ये शक्य त्या ठिकाणी करून निषेध करावयाचा आहे . त्याचबरोबर सोशल मीडियामधून दरवाढी विरोधात मोहीम राबवण्यात येणार आहे.

या करिता प्राथमिक स्वरूपात आज सायंकाळी 6.00 ते 9.00 या वेळेत व्हाट्सअप, फेसबूक, इंस्टाग्राम,ट्विटर, टेलिग्राम इत्यादीवर #Stop_Fartilayzar_Hike मोहीम राबविण्यात यावी, प्रत्येकाने शंभर लोकांच्या मेल वरुन पंतप्रधान कार्यालयाला Email आज पासूनच पाठवायचे आहेत. मेल कसा असावा अणि कोणत्या Mail ID वर पाठवायचा हे आपल्याला कळविण्यात येईल असे राजू शेट्टी यांनी सांगितले आहे. यात जास्तीत जास्त लोकांना यामध्ये सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न करावा. हा संदेश आपल्या संपर्कात असणाऱ्या सर्वांपर्यंत  पोहोचवावा व शेतकरी एकजुटीची ताकद दाखवून द्यावी असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: