अनाथ बालकांसाठी मदत कक्षाची स्थापना – महिला व बालविकास अधिकारी खोमणे यांची माहिती

अनाथ बालकांसाठी मदत कक्षाची स्थापना – महिला व बालविकास अधिकारी खोमणे यांची माहिती Establishment of help desk for orphans – Women and Child Development Officer Dr vijay Khomane

शेळवे प्रतिनिधी (संभाजी वाघुले) : कोविडमुळे किंवा अन्य कोणत्याही कारणाने दोन्ही पालक दगावले असतील, बालकांना कोणी नातेवाईक स्वीकारण्यास तयार नसतील तर अशा अनाथ बालकांसाठी मदत कक्षाची स्थापना केल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा जिल्हा बाल संरक्षण समितीचे सदस्य सचिव डॉ. विजय खोमणे यांनी दिली. हे मदत कक्ष सकाळी 8.00 ते रात्री 8.00 या काळात सुरू राहणार आहेत.

  अनाथ बालके दत्तक देण्यासाठी उपलब्ध आहेत,असे संदेश समाजमाध्यमावर फिरत आहेत, हे संदेश चुकीचे आहेत.अशाप्रकारे बालके दत्तक दिली जात नाहीत,ते बेकायदेशीर आहे,असेही डॉ. खोमणे यांनी सांगितले आहे. जिल्ह्यात अशा बालकांच्या मदतीसाठी महिला व बाल विकास आयुक्तालय आणि सेव्ह द चिल्ड्रेन इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने मदत कक्ष तयार करण्यात आला असून 8308992222 आणि 7400015518 सकाळी 8.00ते रात्री 8.00 वाजेपर्यंत मोबाईलवर संपर्क करता येणार आहे. 

कोणत्याही समाजमाध्यमाद्वारे बालकांची दत्तक प्रक्रिया होत नाही,अशा प्रकारात समाजकंटकांचा समावेश असू शकतो यातून बालकांची अवैध विक्री होऊ शकते.याबाबत जागरूक नागरिकांनी तत्काळ महिला व बाल विकास अधिकारी,पोलीस यंत्रणा यांना माहिती द्यावी,असेही त्यांनी सांगितले.

अनाथ बालकांबाबत आणि बालकांना दत्तक घेऊ इच्छिणाऱ्या पालकांसाठी सेंट्रल अडॉप्शन रिसोर्स अथॉरिटीच्या www.cara.nic.in या संकेतस्थळावर माहिती उपलब्ध आहे.

बालकांबाबत अवैध प्रकार निदर्शनाला आल्यास महाराष्ट्राच्या सारा(स्टेट अडॉप्शन रिसोर्स एजन्सी) या संस्थेच्या 8329041531 क्रमांकावर संपर्क करून माहिती द्यावी किंवा सोलापूर जिल्ह्यातील माहिती 1098 या चाईल्ड हेल्पलाईनच्या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन डॉ.खोमणे यांनी केले आहे.

  बालकांच्या समस्यांबाबत जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, सोलापूर व जिल्हा बाल संरक्षण कक्ष, सोलापूर संपर्क-0217-2310671, चाईल्ड हेल्पलाईन 1098. अधिक माहितीसाठी जिल्हा बाल संरक्षण कक्ष, 1608, दुसरा मजला,शोभानगर, सात रस्ता,सोलापूर येथे संरक्षण अधिकारी रेश्मा गायकवाड 9420447329,जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय, नियंत्रण कक्ष ०२१७- २७३२०००, २७३२०१० यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन डॉ.खोमणे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: