प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत चेअरमन संजय आवताडे यांनी दिला कर्मचाऱ्यांना दिलासा

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधत चेअरमन संजय आवताडे यांच्याकडून कर्मचाऱ्यांना दिलासा

आवताडे शुगरच्या कर्मचाऱ्यांची वेतन वाढ

मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी,दि. २६/०१/२०२५ – कारखान्याच्या माध्यमातून आजपर्यंत शेतकऱ्यांची सेवा केल्याचा मला अभिमान आहे.आपण केवळ आर्थिक प्रगतीकडे लक्ष केंद्रित न करता सामाजिक जबाबदारीही पार पाडत आहोत. प्रत्येकाने आपल्या कार्यातून सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे.या कारखान्याने मागील वर्षी 4 लाख 4 हजार 484 मे. टन गाळप करून 3 लाख 79 हजार 200 क्वि.साखर उत्पादित केलेली आहे. त्याचबरोबर चालू हंगामात कारखान्याने आजपर्यंत 66 दिवसात 2 लाख 66 हजार 740 मे. टन इतके गाळप करून साखर 2 लाख 58 हजार 200 क्वि.साखर उत्पादित केलेली असून सरासरी साखर उतारा 10.00 % इतका आहे. याही वर्षी आपले सर्व कर्मचारी आपण दिलेले टार्गेट पूर्ण करतील हा माझा विश्वास आहे. कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे योगदान दिल्यामुळेच कारखानदारी यशस्वी होत असून त्या कर्मचाऱ्यांचेही सुखदुःख पाहणे आमचे कर्तव्य आहे त्यामुळे मी आज प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून कर्मचाऱ्यांना वेतन वाढ करत असल्याचे मंगळवेढा तालुक्यातील आवताडे शुगरचे चेअरमन संजय आवताडे यांनी ध्वजवंदनानंतर बोलताना जाहीर केले.

यावेळी आवताडे शुगरचे चेअरमन संजय आवताडे म्हणाले की आज आपण या ठिकाणी 26 जानेवारी 2025 रोजी 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी एकत्र जमलेलो आहोत.15 ऑगस्ट 1947 रोजी आपल्या देशाने स्वातंत्र्य मिळवले आणि त्यानंतर 26 जानेवारी 1950 रोजी प्रजासत्ताक बनलो. हा दिवस भारताच्या इतिहासात अतिशय महत्त्वाचा आहे कारण, या दिवशी आपल्या संविधानाची अंमल बजावणी करण्यात आली.या संविधानाने देशाला लोकशाही, न्याय, समता आणि स्वातंत्र्य यांची शिकवण दिली आहे.

आमदार समाधान दादांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचे कामकाज अतिशय योग्य व चांगल्या प्रकारे चालू असून, आपल्या कारखान्याचा उद्देश फक्त आर्थिक प्रगती करणे नाही, तर सर्व कामगार बंधू, शेतकरी वर्ग यांचे जीवनमान उंचावणे असून त्या दृष्टीने खालील प्रमाणे यापूर्वी कामगाराना वेतन वाढ दिलेली आहे. 

दैनिक वेतनावर काम करणार्या कामगारास जून 2024 पासून हंगाम 2022-23 मध्ये रुजू झालेल्यांना रु.2000 व 2023-24 मध्ये कामावर हजर झालेल्यांना रु.1750 प्रमाणे वेतन वाढ दोन्यात आली आहे. तसेच हंगामी कामगारास हि नोव्हेबर २०२४ पासून हंगाम 2022-23 मध्ये रुजू झालेल्यांना रु.2000 व हंगाम 2023-24 मध्ये रुजू झालेल्यांना रु.1500 प्रमाणे वेतन वाढ दिलेली आहे.

त्याचबरोबर प्रजासताक दिनाचे औचित्य साधून मी घोषणा करतो की, कायम सेवेतील कामगारांसाठी माहे जानेवारी २०२५ पासून  हंगाम 2022-23 मध्ये कामावर हजर झालेल्यांना 10 %, हंगाम 2023-24 मधील कामगारास 7.5 % व हंगाम 2024-25 मधील कामगारास 5 % वेतन वाढ देण्यात येईल.

माझे सर्वाना एकच आवाहन आहे कि, एकजुटीने काम करून आपल्या कारखान्याला अधिक प्रगत बनवूया.यावेळी कारखान्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुर्मदास चटके, कार्यकारी संचालक मोहन पिसे,भारत निकम,जनरल मॅनेजर (टेक्निकल) सुहास शिनगारे,मोहन पवार, संभाजी फाळके, बजिरंग जाधव, राहुल नागणे,तोहिद शेख,दामोदर रेवे, अभिजित पवार,चंद्रकांत राठोड,रणजीत पवार, सुधाकर पाटील, रणजीत रणदिवे, अमोल शिंदे तसेच सर्व खातेप्रमुख, विभागप्रमुख, कर्मचारी बंधु व उपस्थित होते.

Leave a Reply

Back To Top