पंढरीत मनसेच्यावतीने स्वर्गीय भारत भालके यांची जयंती साजरी

पंढरीत मनसेच्यावतीने स्वर्गीय आमदार भारत भालके यांची जयंती साजरी

मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना मिष्ठान्न भोजन

स्व.आमदार भारत भालके

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- लोकनेते स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या ६५ व्या जयंती निमित्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते दिलीप धोत्रे यांच्यावतीने गोपाळपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमातील वृद्धांना मिष्टान भोजन देण्यात आले.

याप्रसंगी स्वर्गीय आमदार भारत भालके यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

मनसे नेते दिलीप धोत्रे

याप्रसंगी बोलताना दिलीप धोत्रे म्हणाले की गोरगरीब व सामान्य नागरिकांसाठी भारतनानांचे कार्य मोठे आहे.त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांचा पाईक म्हणून पुढील काळात काम करणार असल्याचे अभिवचन देत भारतनानांचे स्वप्न साकार करण्यासाठी पुढील काळात नागरिकांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम केले जाईल.त्यांच्या जयंतीनिमित्त असं संकल्प करतो की शहर व तालुक्यातील जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी माझे कार्यालय सदैव खुले राहील येणाऱ्या जनतेला मदत करण्याचे काम केले जाईल असे आश्वासन दिलीप धोत्रे यांनी दिले.

यावेळी कोळी समाजाचे ज्येष्ठ नेते अरुण कोळी,मनसे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील, ॲड संदीप रणनवरे,गणेश पिंपळनेरकर, दत्ता वलेकर ,आदिनाथ भोसले,प्रदीप परचंडे, सुरज देवकर,आकाश बंदपट्टे,ओंकार पिसे,अनिल सप्ताळ आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top