नवरात्रीनिमित्त कुंकुमार्चन व 56 भोग
वीरशैव महिला मंडळाचा उपक्रम
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/०९/२०२५ – आद्य वीरशैव महिला मंडळाच्यावतीने नवरात्रीनिमित्त कुमकुम अर्चन चे महत्व असल्याने वशिष्ठ आश्रम रुक्मिणी मंदिर येथे गुरुवारी सामुदायिक कुमकुम अर्चनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

हा कार्यक्रम मंडळाच्या अध्यक्षा डॉ.शोभा कराळे यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आला होता.या कार्यक्रमासाठी मंडळाच्या वतीने रुक्मिणी मातेस साडी चोळी व ५६ भोग नैवेद्य अर्पण करण्यात आला.
या कार्यक्रमासाठी मंडळाच्या उपाध्यक्षा विशालक्षी पावले व संजीवनी ठिगळे यांनी नियोजन केले होते.आद्य वीरशैव महिला मंडळाच्या सर्व पदाधिकारी नंदा भिंगे, सुनीता राहिरकर,मनीषा वासकर ,सुजाता माहीमकर,निर्मला भिंगे , माधुरी भिंगे, कविता पावले ,अनुराधा स्वामी,आरती पावले, सुवर्णा स्वामी यांनी प्रयत्न केले.या कार्यक्रमास सभासद व महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.