पंढरपूर पाटबंधारे उपविभागाच्या शासकीय भूसंपादित जमिनीवरील अतिक्रमण काढण्याचे आवाहन
सोलापूर,दि.19 (जिमाका):- निरा उजवा कालवा कार्यकारी अभियंता यांच्या अधिनस्त उपविभागीय अभियंता,पंढरपूर पाटबंधारे उपविभाग पंढरपूर यांचे कार्यक्षेत्र मैल 93 ( साखळी क्र. 150/000 ) पासून निरा उजवा मुख्य कालवा, निरा उजवा कालवा शाखा क्र. 3, शाखा क्र.4, तिसंगी मध्यम प्रकल्प व तिसंगी मध्यम प्रकल्पावरील मुख्य कालवा व त्यावरील वितरिका यांच्यावरील कालवा वितरिका, लघुवितरिका व इतर प्रयोजनासाठी संपादित केलेल्या शासकीय भूसंपादित जमिनीवरील कृषी / वाणिज्य / रहिवासी व इतर अतिक्रमण केलेले कार्यक्षेत्रावर आढळून येत असून हे अतिक्रम दि. 28 नोव्हेंबर 2025 पूर्वी तात्काळ काढून घेण्यात यावे, असे आवाहन प्रसिध्दी पत्रकान्वये उपविभागीय अभियंता, पंढरपूर पाटबंधारे उपविभाग यांनी केले आहे.

वरील अतिक्रमण दि. 28 नोव्हेंबर 2025 पूर्वी संबंधिताने तात्काळ काढून घेण्यात यावे अन्यथा त्यानंतर कोणतीही पूर्व सूचना न देता अतिक्रमण काढण्यात येईल. होणाऱ्या नुकसानीस संबंधित अतिक्रमण धारक शेतकरी / व्यक्ती जबाबदार राहील,असे पत्रकात नमूद आहे.

