सोलापूर शहर काँग्रेस विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT ) विभागाच्या अध्यक्षपदी युवराज जाधव यांची निवड
युवराज जाधव यांच्या निवडीचे पत्र खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते प्रदान
सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१२/०८/२०२४- माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणितीताई शिंदे, सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या शिफारशीनुसार महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT ) विभागाचे अध्यक्ष अँड पल्लवी बाळकृष्ण रेणके यांनी सोलापूर शहर काँग्रेस विमुक्त जाती व भटक्या जमाती (VJNT ) विभागाच्या अध्यक्षपदी युवराज जाधव यांची निवड केली असून या निवडीचे पत्र खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या हस्ते जनवात्सल्य कार्यालय सोलापूर येथे प्रदान करण्यात आले.
त्यावेळेस सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष चेतन नरोटे, डी ब्लॉक अध्यक्ष देवाभाऊ गायकवाड, दक्षिण सोलापूरचे नेते सुरेश हसापुरे, कैकाडी समाज मा.अध्यक्ष गोपाळ नंदुरकर, प्राध्यापक भोजराज पवार सर, प्रदेश सरचिटणीस सुभाष चव्हाण, VJNT जिल्हाध्यक्ष लक्ष्मण भोसले, प्रदेश सचिव भीमराव आण्णा बंडगर, टकारी समाज सरपंच नारायण जाधव, प्रदेश संघटक मल्लेश आण्णा सूर्यवंशी, मा. डी ब्लॉक अध्यक्ष संजय गायकवाड, VJNT महिला शहराध्यक्ष अंजलीताई मंगोडेकर, माजी सरपंच पांडू आण्णा पवार, विजय जाधव, अनिल जाधव, ज्ञानेश्वर जाधव,बालाजी जाधव, समीर विजापुरे, पप्पू गारे, VJNT महा सचिव मोतीराम आण्णा चव्हाण, सुरेश गायकवाड, अंबादास जाधव गोविंद सिंग शिकलगार, चंद्रकांत लोंढे, श्रीकांत सकट, देवा सोनवणे, धैर्यशील बाबरे, शंकर लोखंडे, विवेक जाधव यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.