कौटूंबिक हिंसाचारापासून महिला संरक्षण अधिनियम 2005
कौटूंबिक हिंसाचारापासून महिला संरक्षण अधिनियम 2005 जालना, दि. 20 (जिमाका)- शासनाकडून कौटुंबिक हिसाचारापासून महिलांच्या संरक्षणासाठी अधिनियम 2005 कायदा तयार करण्यात आला आहे. या कायद्यातंर्गत आपल्या कार्यक्षेत्रातील न्यायदंडाधिकारी यांच्याकडे आपण संरक्षण अधिकारी यांच्यामार्फत अर्ज करू शकता. या कायद्यात तुमच्या किंवा तुमच्या मुलांविरूध्द होणारे कौटूंबिक अत्याचार तुम्ही थांबवू शकता.प्रतिवादीकडून तुमचे स्त्रिधन, दागदागीने,कपडे,कागदपत्रे इत्यादी हस्तगत करू शकता.तुम्ही ज्या…