कौटूंबिक हिंसाचारापासून महिला संरक्षण अधिनियम 2005

कौटूंबिक हिंसाचारापासून महिला संरक्षण अधिनियम 2005

जालना, दि. 20 (जिमाका)- शासनाकडून कौटुंबिक हिसाचारापासून महिलांच्या संरक्षणासाठी अधिनियम 2005 कायदा तयार करण्यात आला आहे. या कायद्यातंर्गत आपल्या कार्यक्षेत्रातील न्यायदंडाधिकारी यांच्याकडे आपण संरक्षण अधिकारी यांच्यामार्फत अर्ज करू शकता.

या कायद्यात तुमच्या किंवा तुमच्या मुलांविरूध्द होणारे कौटूंबिक अत्याचार तुम्ही थांबवू शकता.प्रतिवादीकडून तुमचे स्त्रिधन, दागदागीने,कपडे,कागदपत्रे इत्यादी हस्तगत करू शकता.तुम्ही ज्या सहभागी घरात राहत होता त्या घरात राहण्याचा आपला हक्क आहे. तुमचे सहभागी घर हस्तांतरीत करण्यास किंवा विकण्यास पायबंद घालु शकता.प्रतिवादी कडून आपल्याला आणि आपल्या मुलांना उपजिवीकेसाठी अर्थ सहाय्य मिळवू शकता. मोफत कायदे विषयक सल्ला केंद्र, सेवा पुरविणाऱ्या संस्था,वैद्यकिय सुविधा, निवारगृह इत्यादी आवश्यक त्या सेवासुविधा प्राप्त करून घेवु शकता.

सदर कायद्यान्वये खालील प्रमाणे आदेश मिळवू शकता

कलम 17- सहभागीत घरामध्ये राहण्याचा हक्क मागु शकता. कलम 18- कोणत्या प्रकारचा हिंसाचार होऊ नये यासाठी संरक्षण आदेश. कलम 19- निवासासाठीचा आदेश मिळवू शकता. कलम 20- उपजिवीकेसाठी अर्थसहाय्याचा आदेश मिळवू शकता. कलम 21- यामध्ये आपली अज्ञानपालक मुलांचा ताबा मिळवू शकता. कलम 22- हिंसाचारामध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई मागू शकता.

अधिक संपर्कासाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, तळ मजला जालना येथे किंवा एस. जी. कुलकर्णी 9011778743 यांच्याशी संपर्क साधावा, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी, जालना यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Leave a Reply

Back To Top