श्री.ब.ब्र.राचोटेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांना झालेल्या बेदम मारहाणीबाबत पोलिस निरिक्षक मंगळवेढा पोलिस स्टेशन यांना निवेदन
मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०९/०३/२०२५ – मौजे सिध्दनकेरी ता.मंगळवेढा जि. सोलापूर येथील तोफकट्टी संस्थान मठ येथील शिवाचार्य श्री.ब.ब्र.राचोटेश्वर स्वामीजी हे गेले ३४ वर्षे श्री.सिध्देश्वर मंदिरात पुजा अर्चा व धर्मोपदेशनाचे कार्य करतात.सिध्दकेरी येथे मठाचे जवळजवळ १५० एकर शेतजमीन व कर्नाटक, आंध्र प्रदेश व महाराष्ट्रातील अनेक लिंगायत वाणी, माळी, तेली, समाजाचे ते धर्मगुरू असून समाजात शांतता ऐक्य समभाव व धार्मिक प्रसार व प्रचार करण्याचे कार्य करतात.असे असताना दि.०३/०३/२०२५ रोजी रात्री ९.०० वाजता सहा गावगुंडांनी मठातील लाईट बंद करून सी.सी.टी.व्ही.कॅमेरा फोडून श्री.ब.ब्र. राचोटेश्वर स्वामीना बेदम मारहाण केली आहे.रात्री ९ ते दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत त्यांना ओलीस ठेवले व मोबाईल काढून घेऊन त्यांना कोणासही संपर्क करू दिला नाही.

श्री.ब.ब्र.राचोटेश्वर स्वामी यांचे मोबाईल, हातातील अडीच तोळ्याची अंगठी, दोन समई, देवाच्या मुर्तीवरील दोन सोन्याचे कडगा, तूर त्याचा मोबाईल इ.साहित्य वरील ६ जणांनी नेले आहे.
सदर बाबी पोलिसांना फिर्याद देताना सांगितले असतानाही याची नोंद घेतली गेली नाही.आरोपींची मोबाईल तपासून तातडीने ताब्यात घ्यावेत व यामागील मुख्य सुत्रधार कोण आहे याची चौकशी करून योग्य ती कार्यवाही व्हावी.या घटनेमुळे संपूर्ण लिंगायत वाणी, माळी, तेली समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.आरोपींना सदर कृत्य करण्यात प्रेरित केलेल्या व्यक्तीचेही आरोपीच्या मोबाईल चे रेकॉर्डींग तपासण्यात यावेत अशीही विनंती पोलिस निरिक्षक मंगळवेढा पोलिस स्टेशन यांना करण्यात आली आहे.

