पुणे : प्रकाशन क्षेत्रावर आणखी एक आघात; अरुण जाखडे यांचे निधन


पुणे : पद्मगंधा प्रकाशनाचे संचालक, व्यासंगी लेखक आणि मराठी प्रकाशक परिषदेचे अध्यक्ष अरुण जाखडे (वय ६५) यांचं रविवारी पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. त्यांच्या मागे पत्नी, कन्या आणि चिरंजीव असा परिवार आहे.

मेहता पब्लिशिंगच्या सुनील मेहता यांच्यानंतर आता जाखडे यांच्या निधनाने प्रयोगशील प्रकाशक हरपल्याने प्रकाशन क्षेत्रावर आघात झाला आहे. बालवाङ्मय, विज्ञान, इतिहास आदी विषयांवर जाखडे यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचा फोटो हटवणे दुर्दैवी; पालकमंत्र्यांचा नेमका रोख कुणाकडे?

रा. चिं. ढेरे, व. दि. कुलकर्णी, गणेश देवी अशा दिग्गज लेखक-संशोधकांचे ग्रंथ त्यांनी प्रकाशित केले आहेत. जाखडे यांनी पद्मगंधा आणि आरोग्य दर्पण या दिवाळी अंकांच्या माध्यमातून अभिरूचीसंपन्न अंकांची परंपरा जोपासली. निसर्गरम्य ग्रामीण भागात त्यांचे बालपण गेले. या अनुभवाचा फायदा त्यांना ‘इर्जिक’ या स्तंभलेखनासाठी झाला.

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, पाचरूट, पावसाचे विज्ञान, प्रयोगशाळेत काम कसे करावे, भारताचा स्वातंत्र्यलढा, भारतीय भाषांचे लोकसर्वेक्षण, विश्वरूपी रबर, शोधवेडाच्या कथा आदी विपुल साहित्य त्यांनी प्रकशित केलं आहे. प्रख्यात पत्रकार व लेखक खुशवंत सिंग यांच्या इंग्रजी कथासंग्रहाचा मराठी अनुवाद पद्मगंधातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्राची कुलस्वामिनी, भाग्यविधाती, सर्जक आणि संगोपक अशी श्री तुळजाभवानी मातेच्या प्राचीन मिथकाची प्रेरकता उलगडणारा डॉ. रा. चिं. ढेरे लिखित श्रीतुळजाभवानी हा ग्रंथ पद्मगंधातर्फे प्रकाशित करण्यात आला आहे. जाखडे यांना विविध साहित्य संस्थाचे पुरस्कारही मिळाले आहेत.Source link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: