ड्रोनच्या सहाय्याने शेती फवारणी करणे सोईचे – चेअरमन कल्याणराव काळे

ड्रोनच्या सहाय्याने शेती फवारणी करणे सोईचे – चेअरमन कल्याणराव काळे


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------


भाळवणी / ज्ञानप्रवाह न्यूज,२२/०६/२०२४ – सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना धोंडेवाडी ता.पंढरपूर च्या वतीने आधुनिक पध्दतीने ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर करुन ऊस पिकावर फवारणी करणेचे प्रात्यक्षिक कारखान्याचे कार्यक्षेत्रात पिराची कुरोली येथे कारखान्याचे माजी संचालक व बागायतदार पांडुरंग रामचंद्र कौलगे यांचे शेतातील ऊस पिकावर एअर बोट एरोस्पेस प्रा.लि. व महाराष्ट्र राज्य् सहकारी साखर संघ यांच्या सहयोगाने ऊस पिकावर फवारणी प्रात्यक्षिक घेण्यात आले .या संदर्भात मौजे पिराची कुरोली व भागातील ऊस बागायतदार यांच्या समवेत प्रात्यक्षिक झाले.

या भागातील शेतकऱ्यांना ड्रोनची माहिती कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे यांनी ड्रोनव्दारे फवारणी केल्यास वेळेची बचत, औषधाचा परिणाम व किफायतशीर औषधाचा वापर असे विविध फायदे होणार आहेत. तसेच ऊस बागायतदार यांनी सदर ड्रोन खरेदी केल्यास महाराष्ट्र शासनाचे वतीने 50 टक्के सबसिडी देण्यात येणार आहे. जर संस्थेने ड्रोन खरेदी केल्यास त्यांना 40 टक्के सबसिडी देण्यात येणार आहे. अशी माहिती देण्यात आली. एअर बोट एरोस्पेस कंपनीचे अधिकारी प्रथमेश यांनी फवारणी संदर्भात प्रात्यक्षिक दाखवुन माहिती दिली व भागातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना संबोधित केले.

याप्रसंगी कारखान्याचे व्हा.चेअरमन भारत कोळेकर, ऊस तोडणी वाहतुकीचे चेअरमन मोहन नागटिळक, संचालक सर्वश्री परमेश्वर लामकाने, अमोल माने, अरुण नलवडे, सुरेश देठे, माजी संचालक पांडुरंग कौलगे, इब्राहिम मुजावर, राजाराम माने, कंपनीचे अधिकारी तसेच भागातील ऊस बागायतदार व कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक पोपटराव घोगरे, शेती अधिकारी प्रतापराव थोरात, ऊस पुरवठा अधिकारी हरि गिड्डे व कारखान्याचा सर्व शेती स्टाफ उपस्थित होता.


Discover more from Dnyan prawah news

Subscribe to get the latest posts sent to your email.


ADVERTIISEMENT
-----------------------------------------------------

Leave a Reply

Discover more from Dnyan prawah news

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading