राजकीय न्यूज

मोदींची गॅरंटी हेच विकासाचे सूत्र – प्रणव परिचारक

फिर एक बार मोदी सरकार – प्रणव परिचारक

पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – भारतीय जनता पार्टीच्या गाव चलो अभियान अंतर्गत प्रणव परिचारक यांनी पांढरेवाडी या गावात प्रवास केला.पांढरेवाडी गावात विविध क्षेत्रातील नागरिकांसह महिला शेतकरी तरुण वर्गाच्या गाठी भेटी घेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या जनतेप्रति असलेल्या योजनांचा आणि कार्याचा जागर केला.

पांढरेवाडी येथे प्रणव परिचारक यांचे आगमन होताच फटाक्याच्या आतषबाजीने स्वागत करण्यात आले.महिलांनी औक्षण करून त्यांचे स्वागत केले.यानंतर पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमेचे पूजन करत भारतीय जनता पार्टीच्या सरकारने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेप्रती सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती आणि माहिती पत्रके प्रणव परिचारक यांनी नागरिकांकडे दिली.

जनतेचे आयुष्यात अमुलाग्र बदल घडवून आणू शकतील अशा लोकपयोगी योजना मोदी सरकारने आणल्या आहेत.मोदींची गॅरंटी हेच विकासाचे सूत्र आहे.त्यामुळे पक्षाचे कार्यकर्ता यांनी समर्पक भावनेने काम करत असताना नागरिकांनीदेखील देशाप्रती समर्पणाने काम करणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवावा,असे आवाहन यावेळी परिचारक यांनी केले.

पांढरेवाडी येथे प्रणव परिचारक यांनी मान्यवर प्रतिष्ठित व्यक्ती, सर्वसामान्य नागरिक यांच्याशी संवाद साधला. नागरिकांनी आपल्या गावातील काही समस्यांची निवेदने,पत्रके व कैफियत परिचारक यांच्यापुढे मांडल्या. या सर्व सूचना कैफियत यांचा पाठपुरावा लवकरच केला जाईल असेही त्यांनी आश्वस्त केले.

ह्या बैठकीत नमो एप डाउनलोड,बूथ स्तरावर कार्यकर्त्यांचा व जनता यांचा व्हाट्सएप्प ग्रुप तयार करणे, बूथ समित्यांची तयारी अश्या अनेक महत्वाच्या विषयावर चर्चा झाली. यावेळी भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी,जेष्ठ मार्गदर्शक मंडळी,कार्यकर्ता बंधू मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *