लायन्स क्लब पंढरपूरच्या वतीने शहरात दोन चिल्ड्रेन्स पार्कची निर्मिती
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज-लायन्स क्लब पंढरपूरच्यावतीने पंढरपूर शहरामध्ये श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र परदेशी नगर व छत्रपती शिवाजीनगर इसबावी येथे चिल्ड्रेन्स हेल्थ पार्कचे उद्घाटन माजी प्रांतपाल राजशेखर कापसे व पंढरपूर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी महेश रोकडे ,माजी नगरसेवक गणेश आधटराव यांच्या हस्ते तर डॉ मनोज भायगुडे, मोहन मंगळवेढेकर, लायन्सचे झोन चेअरमन विवेक परदेशी,सुरेश पडवळे,आर. सी.ऐनापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.

लायन चिल्ड्रन पार्क निर्मितीचे ध्येय बाळगून अध्यक्षा आरती बसवंती यांनी अध्यक्षपदाची धुरा हाती घेतली होती. समाजातील अनेक दानशूर व्यक्तींनी त्यांच्या आवाहनास प्रतिसाद देऊन चिल्ड्रेन्स हेल्थ पार्कची निर्मिती करण्यात त्या यशस्वी झाल्या.

छत्रपती शिवाजीनगर इसबावी येथील चिल्ड्रेन्स पार्कसाठी माजी नगरसेवक गणेश अधटराव यांचे मोलाचे योगदान लाभले तसेच प्रकल्प प्रमुख लायन डॉ.मनोज भायगुडे,डॉ शितल शहा,विवेक परदेशी यांनी योगदान दिले व परिश्रम घेतले.
श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र परदेशी नगर येथील पार्कसाठी लायन्स क्लबचे डॉ अजित गुंडेवार,डॉ धीरज पाटील, राजेंद्र गुप्ता,अमरनाथ परदेशी यांचे मोलाचे योगदान लाभले. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र व श्री साईबाबा चॅरिटेबल ट्रस्टचे सर्व पदाधिकारी व सदस्य यांनीही सहकार्य केले.

सदर प्रसंगी माजी प्रांतपाल लायन राजशेखर कापसे यांनी सांगितले की लायन्स क्लब हा समाजामध्ये जी गरज आहे ती ओळखून कार्य करतो.
चिल्ड्रन्स पार्क व नाना नानी पार्क च्या निमित्ताने हजारो नागरिकांची बालगोपालांची सेवा घडणार आहे.चेअरमन लायन विवेक परदेशी यांनी सांगितले की आजकालची लहान मुलं, विद्यार्थी हे मोबाईलच्या आहारी जात आहेत व मैदानी खेळ विसरत आहेत.सदर चिल्ड्रेन्स पार्क च्या माध्यमातून लहान मुले,विद्यार्थी ग्राउंड वर येतील व मैदानी खेळ खेळतील त्यामुळे ते शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त होतील.मोबाईलच्या दुष्परिणामा पासून त्यांचा बचाव होईल.
अध्यक्ष लायन आरती बसवंती यांनी सांगितले की पंढरपूर शहरांमध्ये चिल्ड्रेन्स पार्क उभा करणे हे आमचे प्रमुख ध्येय होते, पंढरपूर मध्ये दोन ठिकाणी चिल्ड्रन्स पार्क आम्ही निर्माण केले याचे आम्हाला खूप समाधान वाटत असल्याचे सांगितले.

याप्रसंगी लायन्स सेक्रेटरी ओंकार बसवंती, शोभा गुप्ता, सीमा गुप्ता, स्मिता अधटराव, धर्मराज घोडके,रा.पा.कटेकर,सनी मुजावर, कृतांजली सावंत,डॉ संध्या गावडे,डॉ.सुरेखा बोरावके, डॉ अश्विनी परदेशी,मुन्नागीर गोसावी, कैलास करंडे, इम्रान मुल्ला, मंदार केसकर ,डि.व्ही.कुलकर्णी,मिनाक्षी झांबरे, पारुल परमार,सौ कुलकर्णी,प्रकाश परदेशी, प्रमोद पोतदार, विष्णुपंत देशमुख,ज्योतीराम भायगुडे,राजेंद्र माने,शंकर सुरवसे,अमोल पवार आदी तसेच बहुसंख्येने दोन्ही सोसायटीतील नागरिक व बालगोपाळ उपस्थित होते.
