या योजनेच्या लाभार्थ्यांनी स्वहिस्सा न भरल्यास सदरचा प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता

या योजनेच्या लाभार्थ्यांनी स्वहिस्सा न भरल्यास सदरचा प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता If the beneficiaries of this scheme do not pay their dues, the project is likely to get into trouble
 पंढरपूर,25/09/2021 - पंढरपूर नगरपरिषदेमार्फत प्रधानमंत्री आवास योजनांतर्गत परवडणारी घरे या घटकांतर्गत २०९२ घरकूले बांधणेची योजना सर्वे नं.१७ ब येथे सुरू आहे. या प्रकल्पा मधील पहिल्या टप्प्यात ८९२ घरकूले बांधणेचे काम चालू आहे. नगरपरिषदेने दि. ०८ मार्च २०२१ रोजी ऑनलाईन लॉटरी पद्धतीने ८९२ लाभार्थ्यांची निवड केलेली आहे. या लाभार्थ्यांनी प्रकल्पामध्ये सदनिका मिळणेकरिता स्वहिश्श्याची रक्कम रु. ५.९५ लाख रूपये भरणे अपेक्षित आहे.

  नगरपरिषदेने ८९२ मंजूर लाभार्थ्यांना घरकुला संदर्भात स्वहिस्सा भरणेकरिता जुलै महिन्यात नोटीस दिल्या होत्या. मात्र अद्यापर्यंत फक्त १४ इतक्या लाभार्थ्यांनी स्वहिश्श्याची रक्कम नगर परिषदेकडे भरलेली आहे. या योजनेच्या लाभार्थ्यांनी स्वहिस्सा न भरलेस सदरचा प्रकल्प अडचणीत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे नगरपरिषद प्रशासनाने हा प्रकल्प यशस्वीरित्या पूर्ण करणेकरिता लाभार्थ्यांनी स्वहिश्श्याची रक्कम भरणेकरिता ७ दिवसांच्या मुदतीची अंतिम नोटीस देण्याचा निर्णय घेतला आहे.७ दिवसात लाभार्थ्यांनी स्वहिश्श्याची रक्कम न भरलेस त्यांची मंजूर सदनिका पुढील लाभार्थ्याला देणेबाबत कार्यवाही करण्यात येणार आहे.

   नगरपरिषद प्रशासनातर्फे ज्या लाभार्थ्यांना सदनिका मंजूर झालेली आहे त्यांनी पुढील ७ दिवसात त्यांची स्वहिश्श्याची रक्कम नगरपरिषदे कडे भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

    नगरपरिषद प्रशासनातर्फे प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सदनिका मिळण्याकरिता जास्तीत जास्त लोकांनी अर्ज करण्याचे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे. नागरिकांनी सदरचे अर्ज नगरपरिषदेतील प्रधानमंत्री आवास योजना कक्षामध्ये सादर करणेचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: