Uttarakhand: पंतप्रधान मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा उत्तराखंड दौरा निश्चित


हायलाइट्स:

  • पंतप्रधान नरेंद्र मोदी ७ ऑगस्ट रोजी उत्तराखंड दौऱ्यावर
  • संरक्षण मंत्री राजनाथ सिंह १ ऑगस्ट रोजी देणार उत्तराखंडाला भेट
  • उत्तराखंड विधानसभा निवडणूक २०२२ ची तयारी

नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या ७ ऑक्टोबर रोजी उत्तराखंडचा दौरा करणार असल्याची माहिती देण्यात आलीय. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अगोदर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह १ ऑक्टोबर रोजी उत्तराखंडाला भेट देणार आहेत.

७ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान मोदी आपल्या संवैधानिक पदाचा २० वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करत आहेत. याच निमित्तानं पंतप्रधान उत्तराखंडात ‘जॉलीग्रांट एअरपोर्ट टर्मिनल’चं लोकार्पण करतील तसंच ऋषिकेश एम्समध्ये ऑक्सिजन प्लान्टचं उद्घाटनही पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे. या दरम्यान पंतप्रधान ‘केदारनाथ धाम’लाही भेट देण्याची शक्यता आहे.

आगामी वर्षात उत्तराखंड विधानसभा निवडणूक

उल्लेखनीय म्हणजे, उत्तराखंडात आगामी वर्षांत विधानसभा निडवणुका पार पडणार आहेत. या निवडणुकीची तयारी भाजपकडून आधीपासूनच सुरू करण्यात आलीय. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधानांचा हा दौरा अतिशय महत्त्वाचा मानला जातोय.

India China: चिनी सैनी उत्तराखंडात घुसले… पूल उद्ध्वस्त केला आणि निघून गेले!
Shahid Amrish Tyagi: जन्मानंतर १६ वर्षांनी पहिल्यांदाच मुलीनं पाहिला शहीद पित्याचा मृतदेह
संरक्षण मंत्रीही उत्तराखंडचा दौरा करणार

पंतप्रधानांच्या या दौऱ्याअगोदर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हेदेखील उत्तराखंडचा दौरा करणार आहेत. येत्या १ ऑक्टोबर रोजी ‘पेशावर विद्रोहा’चे नायक ठरलेल्या वीर चंद्र सिंह गढवाली यांच्या स्मारकाचं अनावरण करण्यासाठी संरक्षण मंत्री उत्तराखंडातील पीठसैंण गावाला भेट देणार आहेत. पीठसैंण हे गढवाली यांची मूळ गाव होतं. तत्कालीन ‘रॉयल गढवाल रायफल्स’मध्ये हवालदारपदाची जबाबदारी निभावणाऱ्या वीर चंद्र सिंह गढवाली यांना १९३० च्या ‘पेशांवर विद्रोहा’चं नायक म्हणून ओळखलं जातं. इंग्रज अधिकाऱ्यांचे आदेश धुडकावून लावत भारताच्या स्वातंत्र्यासाठी निशस्रपणे आंदोलन करणाऱ्या पठाणांवर गोळीबार करण्यात गढवाली यांनी स्पष्टपणे नकार दिला होता.

उत्तराखंड सीमेवरही तणावाचं वातावरण

दरम्यान,भारत आणि चीन दरम्यान पूर्व लडाख भागात तणाव सुरू असतानाच चीनच्या ‘पिपल्स लिबरेशन आर्मी’च्या (PLA) जवानांनी उत्तराखंडातही घुसखोरीचा प्रयत्न केल्याचं समोर आलंय. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, चीनलगत उत्तराखंडातील ‘बाराहोती’ भागात जवळपास १०० सैनिक दिसून आले. भारताच्या हद्दीतून परतण्यापूर्वी चिनी सैनिकांनी एका पुलाचं नुकसान केलंय. सूत्रांच्या माहितीनुसार, ‘तून-जून ला’ ओलांडत ५५ घोडे आणि १०० हून अधिक चिनी सैनिकांनी भारतीय हद्दीत ५ किलोमीटरहून पुढे प्रवेश केला होता. गेल्या काही वर्षांपासून चीनची नजर पुन्हा एकदा या भागाकडे वळलीय. गेल्या जुलै महिन्यात पीएलएकडून करण्यात आलेल्या घुसखोरीच्या प्रयत्नामुळे चिंतेत वाढ झाली होती. पूर्व लडाख भागातही तणावाचं वातावरण कायम आहे. या पार्श्वभूमीवरही संरक्षण मंत्र्यांचा उत्तराखंड दौरा महत्त्वाचा ठरू शकतो.

Murder Mystery: आंतरराष्ट्रीय बायकरचा मृत्यू : सामान्य मृत्यू नाही तर हत्या, तीन वर्षानंतर खुलासा
कारगिलमध्येही अत्याधुनिक क्रीडा प्रशिक्षण केंद्र, केंद्रीय मंत्र्यांची घोषणाSource link

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: