रमजान ईद निमित्त अभिजीत पाटील मित्र परिवार यांच्या वतीने नाममात्र दरात दुध वाटप

चेअरमन अभिजीत धनंजय पाटील यांनी विठ्ठल परिवारांची जपली परंपरा
रमजान ईदनिमित्त सामाजिक सलोख्याचे दर्शन पाटील यांच्यात दिसून आले

पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज दि.11/04/2024- मुस्लिम बांधवांचा सर्वात मोठा सण म्हणून ओळखला जाणारा रमजान ईद या सणाच्या निमित्ताने दि.११एप्रिल रोजी पंढरपूर शहरांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते तथा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत धनंजय पाटील मित्र परिवाराच्यावतीने मुर्शिदबाबा दर्गा, कालिकादेवी चौक येथे दर्गाजवळ वाटप करण्यात आले.

हिंदू मुस्लिम एकोप्याचे शहर म्हणून ओळखले जाणारे पंढरपूर शहर तसेच मंगळवेढा या शहरांमधील मुस्लिम बांधवांना रमजान ईद च्या निमित्ताने इफ्तार पार्टी देऊन सामाजिक कार्यात अभिजीत पाटील यांनी खारीचा वाटा उचलला होता.
दूध वाटप तेथील दूध वाटप केंद्रावर आलेल्या मुस्लिम बांधवांनी सांगितले
यंदाच्या वर्षीदेखील रमजान ईद च्या निमित्ताने अभिजीत पाटील मित्रपरिवाराच्यावतीने आज दूध वाटपाचे नियोजन करण्यात आले होते. कालिका देवी परिसरातील त्याचप्रमाणे त्यालगत असलेल्या बागवान मोहल्यामधील मुस्लिम बांधवांनी या दूध वाटपाचा लाभ घेतला. सणानिमित्त दुध जास्त प्रमाणात लागत असल्याने अनेकांची दुध गोळा करण्यासाठी तारांबळ होते परंतू नाममात्र दरामध्ये दूध उपलब्ध करून दिल्याबद्दल तमाम मुस्लिम बांधव अभिजीत धनंजय पाटील मित्र परिवाराला धन्यवाद देत आहोत.

Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.