स्टार फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीने व्हेनेझुएला आणि बोलिव्हियाविरुद्धच्या दक्षिण अमेरिकन विश्वचषक पात्रता सामन्यांसाठी अर्जेंटिना राष्ट्रीय संघात पुनरागमन केले आहे. 37 वर्षीय मेस्सी घोट्याच्या दुखापतीमुळे अलिकडच्या सामन्यांमधून बाहेर होता.
कोपा अमेरिका फायनलमध्ये कोलंबियाविरुद्धच्या सामन्यात मेस्सीला दुखापत झाल्यामुळे शेवटच्या दोन फेऱ्यांमध्ये खेळता आलेला नाही. अर्जेंटिना 18 गुणांसह दक्षिण अमेरिकन पात्रतामध्ये आघाडीवर आहे. त्यानंतर कोलंबियाचे 16 गुण आहेत तर उरुग्वेचे 15 गुण आहेत.
अर्जेंटिनाचा संघ पुढीलप्रमाणे आहे.
गोलरक्षक: वॉल्टर बेनिटेझ, जेरोनिमो रुल्ली, जुआन मुसो.
बचावपटू: गोंझालो मॉन्टिएल, नहुएल मोलिना, क्रिस्टियन रोमेरो, जर्मन पेझेला, मार्कोस अकुना, लिओनार्डो बालेर्डी, निकोलस ओटामेंडी, लिसांद्रो मार्टिनेझ, निकोलस टॅगलियाफिको.
मिडफिल्डर: लिएंड्रो परेडिस, ॲलेक्सिस मॅकअलिस्टर, एन्झो फर्नांडीझ, जिओवानी लो सेल्सो, निकोलस पेझ, एक्क्विएल पॅलासिओस, रॉड्रिगो डी पॉल, व्हॅलेंटीन कार्बोनी.
स्ट्रायकर: थियागो अल्माडा, लिओनेल मेस्सी, निकोलस गोन्झालेझ, अलेजांद्रो गार्नाचो, ज्युलियन अल्वारेझ, पाउलो डायबाला, लॉटारो मार्टिनेझ.
Edited By – Priya Dixit
Discover more from Dnyan pravah news
Subscribe to get the latest posts sent to your email.