भारतवर्षी दिगंबर जैन तीर्थ क्षेत्र समिती महाराष्ट्र झोन पंचवार्षिक कार्यकारिणी व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ संपन्न

श्री णमोकार तीर्थ चांदवड येथे श्री भारतवर्षी दिगंबर जैन तीर्थ क्षेत्र समिती महाराष्ट्र झोन पंचवार्षिक कार्यकारिणी व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ

आचार्य गुरुवर्य श्री देवनंदीजी महाराज व त्यांचा संघाच्या पवित्र सानिध्यात भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थ क्षेत्र समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न

नाशिक/ ज्ञानप्रवाह न्यूज –श्री णमोकार तीर्थ चांदवड येथे श्री भारतवर्षी दिगंबर जैन तीर्थ क्षेत्र समिती महाराष्ट्र झोनच्या पंचवार्षिक कार्यकारिणी व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ परमपूज्य प्रज्ञाश्रमण सारस्वताचार्य 108 आचार्य गुरुवर्य श्री देवनंदीजी महाराज व त्यांचा संघ यांच्या पवित्र सानिध्यात भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थ क्षेत्र समितीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रविवार, २० ऑक्टोबर रोजी संपन्न झाला यावेळी संपूर्ण महाराष्ट्रातील विविध शहरातून शेकडो गुरुभक्त उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात मंगलचरणाने झाली. त्यानंतर परमपूज्य गणाधिपती गणधाराचार्य 108 आचार्य श्री कुंथुसागरजी महाराज यांच्या फोटोचे अनावरण, पुष्प अर्पण व दीपप्रज्वलन करून भारतवर्षी दिगंबर जैन तीर्थ क्षेत्र समितीचे राष्ट्रीय सरचिटणीस संतोष पेंढारी, राष्ट्रीय उपाध्यक्ष निलम अजमेरा, संजय पापडीवाल, अध्यक्ष संजय पाटील, नूतनीकरण समिती अनिल जामगे, बाबूभाई गांधी, नवनिर्वाचित प्रांताध्यक्ष मिहीर गांधी, प्रांत सरचिटणीस ओम पाटणी, प्रांत उपाध्यक्ष रवींद्र देवमोरे, रमणिक कोठाडिया, सुमेर काळे, ललित पाटणी,महेंद्र शहा,पवन पाटणी,संतोष काला, महेंद्र काळे, विजय लोहाडे, पारस लोहाडे आदींच्या हस्ते संपन्न झाला. त्यानंतर सारस्वताचार्य श्री देवनंदीजी महाराज यांचे पूजन व पादप्रक्षालन बाबुभई गांधी कुटुंबीयांच्या हस्ते करण्यात आली.

बाबुभाई गांधींचा अमृत महोत्सव (75 वा) वाढदिवस मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला आणि त्यांना प्रमाणपत्र देऊन त्यांना आर्यन समाज शिरोमणी ही पदवी देऊन गौरविण्यात आले. त्याचबरोबर निलम अजमेरा, संतोष पेंढारी, अनिल जमगे यांचा भारतवर्षी दिगंबर जैन तीर्थ क्षेत्र समितीमध्ये नवीन जबाबदारी मिळाल्याबद्दल तसेच सुनील पाटणी यांची महाराष्ट्र राज्य जैन अल्पसंख्याक महामंडळ समितीमध्ये निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाची प्रस्तावना व स्वागत णमोकार तीर्थ क्षेत्राच्या अध्यक्षा व तीर्थ क्षेत्र समितीच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा निलम अजमेरा यांनी केले .त्यानंतर महाराष्ट्र विभागीय कार्यकारिणीचे वरिष्ठ प्रांत उपाध्यक्ष रवी देवमोरे, महेंद्र शहा, नूतन प्रांताध्यक्ष मिहीर गांधी,अनिल जमगे , नूतन प्रांत सरचिटणीस ओम पाटणी ,राष्ट्रीय सरचिटणीस संतोष पेंढारी यांनी मनोगत व्यक्त केले.

सर्व वक्त्यांनी तीर्थक्षेत्रांचे संरक्षण,संवर्धन व विकास, सभासद संख्या वाढविण्याबाबत आपले विचार व्यक्त केले.

राष्ट्रीय सरचिटणीस संतोष पेंढारी यांनी भारतवर्षी दिगंबर जैन तीर्थक्षेत्र समितीचे सुरू असलेले कार्य व विविध तीर्थक्षेत्रात सुरू असलेल्या न्यायालयीन खटल्यांची सद्यस्थिती याविषयी माहिती दिली.

परमपूज्य प्रज्ञाश्रमण सारस्वताचार्य 108 आचार्य श्री देवनंदीजी महाराज यांनी सर्व तीर्थांवर पाळल्या जाणाऱ्या परंपरा न बदलण्याबद्दल सांगितले आणि तीर्थांच्या विकासात समाजाला हातभार लावण्याचा नारा दिला यासोबतच सर्व तिर्थक्षेत्रातील कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड असावा आणि प्रत्येकाच्या गळ्यात ओळखपत्र असावे असे मत व्यक्त करताना मी नूतन पंचवार्षिक कार्यकारिणीला शुभेच्छा देतो जेणेकरून ही कार्यकारिणी यशस्वी होईल. त्यानंतर सर्व निवडक अधिकाऱ्यांना प्रांतीय सरचिटणीस ओम पाटणी यांनी अभिनंदन पत्र दिले.

या कार्यक्रमासाठी सर्व भाविकांना निवास आणि स्वादिष्ट फराळ व भोजनाची पुरेशी व्यवस्था करण्यात आली होती. सभागृहात येण्यापूर्वी सर्वांचे श्री सन्मती सेवा दलाच्या पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्रीयन टोपी, स्वागत दुपट्टा व गुळ देऊन स्वागत केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सोलापूरचे प्रथमेश विपीन कासार व ओम पाटणी यांनी केले.

Leave a Reply

Back To Top