दिवाळीच्या पहिल्याच दिवशी दणका;सिलिंडर दरवाढीचा उडाला भडका, चेन्नईत भाव २१३३ रुपयांवर


हायलाइट्स:

  • वाणिज्य वापराच्या १९ किलोच्या सिलींडरच्या दरात तब्बल २६५ रुपयांची वाढ झाली.
  • या दरवाढीने छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडणार.
  • घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत तूर्त कोणताही बदल केलेला नाही.

मुंबई : पेट्रोल आणि डिझेलपाठोपाठ सिलिंडरच्या किमतीत आज सोमवारी प्रचंड वाढ झाली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी वाणिज्य वापराच्या १९ किलोच्या सिलींडरच्या दरात तब्बल २६५ रुपयांची वाढ केली आहे. या दरवाढीने छोट्या व्यावसायिकांचे कंबरडे मोडणार असून त्यांच्याकडून खाद्यपदार्थांच्या किमती वाढवल्या जाण्याची शक्यता आहे. तर घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत तूर्त कोणताही बदल केलेला नाही.

कमी किमतीच्या विम्याचा अभाव; ४० कोटी लोकांकडे नाहीय आरोग्य विमा संरक्षण
आजच्या दरवाढीनंतर वाणिज्य वापराचा सिलिंडर २६५ रुपयांनी महागला आहे.आज १ नोव्हेंबरपासून देशभरात वाणिज्य वापराचा १९ किलोचा गॅस सिलिंडर २६५ रुपयांनी महागला आहे. मुंबईत १९ किलोचा गॅस सिलिंडर १९५० रुपये झाला आहे. याआधी तो १६८३ रुपयांना मिळत होता.

RBI ने चालू खात्याबाबत बँकांचे नियम केले सोपे; जाणून घ्या ताज्या अपडेट्स
देशातील सर्वात महाग सिलिंडर चेन्नईत झाला आहे. चेन्नईत आजच्या दरवाढीनंतर १९ किलोच्या वाणिज्य वापराच्या सिलिंडरची किंमत तब्बल २१३३ रुपये झाली आहे. कोलकात्यात या सिलिंडची किंमत २०७३.५० रुपये इतकी वाढली आहे. यामुळे वडापाव विक्रेते , छोटे हॉटेल व्यावसायिक यांचे आर्थिक गणित बिघडणार असून खाद्यपदार्थांच्या किमतीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

दिवाळीत मुलीला द्या खास गिफ्ट; ‘या’ योजनेत गुंतवणूक करून तिचं भविष्य करा सुरक्षित
दरम्यान, १४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात मात्र कोणतंही बदल झालेला नाही. मुंबईत १४.२ किलोचा अनुदानित घरगुती सिलिंडरचा भाव ८९९.५० रुपये झाला आहे. नवी दिल्लीमध्ये सिलिंडरचा भाव रुपये ८९९.५० रुपये झाला आहे. कोलकात्यात ९२६ रुपये आहे. चेन्नईत सिलिंडर ९००.५० रुपये झाला आहे.Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

%d bloggers like this: