प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येस महिलांवरील कौटुंबिक हिंसाचार थांबवण्यास प्रतिबंधात्मक व कौटुंबिक सुरक्षा कायद्याची वेगाने कारवाई गरजेची: उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

चौथ्या महिला धोरणाच्या अंमलबजावणी साठी योजना अंमलबजावणीत महिलाकेंद्री दृष्टीकोन आवश्यक उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे स्री आधार केंद्र चर्चासत्रात आवाहन

प्रजासत्ताक दिनाच्या पुर्वसंध्येस महिलांवरील कौटुंबिक हिंसाचार थांबवण्यासाठी प्रतिबंधात्मक कारवाया व कौटुंबिक सुरक्षा कायद्याची वेगाने कारवाई गरजेची:

पत्नीचा कात्रीने पुण्यातील व हैदराबादमधील पत्नीचा कुकरमध्ये शिजवून हत्येप्रकरणी प्रकरणी दखल

पुणे / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५ :स्त्री आधार केंद्रातर्फे जागतिक महिलांवरील हिंसाचार विरोधी दिनानिमित्त आज २५ जानेवारी २०२५ भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

विधानपरिषद उपसभापती व स्त्री आधार केंद्राच्या अध्यक्षा डॉ.नीलम गोऱ्हे यांच्या मार्गदर्शनात हा कार्यक्रम पार पडला. महाराष्ट्र शासनातर्फे जाहीर करण्यात आलेल्या ४ थे महिला धोरणातील मुद्द्यांवर प्रत्यक्षात काम करत असताना महिलांना कसा उपयोग करता येईल याबाबत डॉ.नीलम गोऱ्हे यांनी मार्गदर्शन केले.याबाबत गटचर्चाही करण्यात आली.

स्त्री आधार केंद्राच्या या कार्यक्रमांमध्ये दोन ठराव उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांच्यामार्फत मांडण्यात आले आणि ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले. यामध्ये कौटुंबिक हिंसाचार प्रतिबंधक कायदा २००५ ची अंमलबजावणी अद्यापपर्यंत होत नाही तसेच यामध्ये योग्यवेळी प्रतिबंधात्मक कारवाई संबंधित पीडितेच्या पतीवर करण्या बाबत पहिला ठराव संमत करण्यात आला. तसेच बीट स्तरावर महिला दक्षता समिती स्थापन करून महिलांचा सक्रिय सहभाग घेण्यात यावा याबाबत ठराव मांडण्यात आला.

स्त्री विषयक प्रश्नांवर काम करणाऱ्या विविध संघटना व स्त्री आधार केंद्र सदस्यांच्या स्थापित एकूण ४ गटांमार्फत ४ थे महिला धोरणातील १२ विषयांवर स्त्रियांचे प्रश्न व त्यावरील संभाव्य उपाययोजना याबाबत सखोल चर्चा करण्यात आली व त्याचे दस्तऐवजीकरण करण्यात आले.

महिलांचे प्रश्न, त्यावर सदस्यांनी केलेले काम आणि त्यातून आलेले अनुभव, त्यातील आव्हाने, शासनाची धोरणे, योजना तसेच अंमलबजावणीतील त्रुटी व अडचणी आणि त्यावरील उपाय यावर सखोल चर्चा होणे अपेक्षित आहे. स्त्री आधार केंद्राच्या माध्यमातून याची सुरुवात झाली असून यातून आपण गटचर्चेमधून आलेले निष्कर्ष नोंदवून सादर करावे असे डॉ.नीलम गोऱ्हे यांनी आवाहन केले.

पीडित महिलांना योग्य न्याय मिळवून देण्यात समाज कमी पडत असल्याने स्त्री अत्याचार विरोधी काम करणाऱ्या संस्थांनी शासन दरबारी न्यायासाठी पाठपुरावा करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी विशद केले.

त्याचबरोबर विद्यमान सरकारची स्त्री अत्याचार रोखण्यात महत्त्वाची भूमिका राहिली आहे. लाडकी बहीण योजनेतून शासनामार्फत मदतीचा हात स्त्रियांना मिळाला आहे. यामध्ये स्त्री विषयक विविध संघटनांचे निश्चितच योगदान आहे,असेही डॉ. नीलम गोऱ्हे म्हणाल्या.

या चर्चासत्राचे प्रमुख उद्दिष्ट म्हणजे महिलांवरील हिंसाचाराची गंभीरता समजून घेणे, त्यावर जनजागृती करणे आणि महिलांना सुरक्षित आणि समान अधिकार प्राप्त होण्यासाठी आवश्यक पावले उचलणे हा आहे.

यावेळी कार्यक्रमाला स्त्री आधार केंद्राच्या विश्वस्त जेहलम जोशी, शिरीष फडतरे, ॲड. प्रार्थना सदावर्ते, अपर्णा पाठक, अनिता शिंदे, शोभा कोठारी, शिवसेना पंढरपूर जिल्हाप्रमुख आरती बसवंती, आश्लेषा खंडागळे, अनिता परदेशी, सुवर्णा कांबळे, राखी शिंगवी,मंगल पाटील, मंगल सोनटक्के, अनिता परदेशी, शुभांगी जगताप, कल्पना आव्हाड, नंदा उबाळे, रेणुका नाईक, रेखा कदम आणि स्त्री आधार केंद्राच्या महिला सदस्य व इतर सामाजिक स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधी उपस्थित होत्या.

Leave a Reply

Back To Top