मंगळवेढा पोलीस ठाण्यातील दोन पोलीस कर्मचारी पाच लाखाची लाच स्विकारताना लाचलुचपत पथकाच्या जाळ्यात1
स्वांतत्र दिनाच्या पुर्व संधेला लाचलुचपतच्या कारवाईने पोलीस दलात खळबळ…..

मंगळवेढा /मोहन पाटील /ज्ञानप्रवाह न्यूज :मंगळवेढा
पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार महेश कोळी,पोलीस अंमलदार वैभव घायाळ या दोघांनी भविष्यात दाखल होणार्या गुन्ह्यामधून तक्रारदार यांचे आरोपी म्हणून असलेले नाव कमी करण्यासाठी तसेच इतर नातेवाईकांना गुन्ह्यामध्ये अटकपुर्व जामीनसाठी सहकार्य करण्यासाठी दहा लाखाच्या लाचेची मागणी केली होती त्यापैकी पहिला हप्ता म्हणून पाच लाख स्विकारताना सांगली येथील लाचलुचपत विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडल्याने मंगळवेढ्याच्या पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेबाबत समजलेली माहिती अशी की, यातील आरोपी पोलीस हवालदार महेश कोळी व पोलीस अंमलदार वैभव घायाळ मागील काही वर्षापासून मंगळवेढा पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत.तक्रारदार यांच्या विरुध्द मंगळवेढा पोलीस ठाण्यात एक अर्ज दाखल असून अर्ज चौकशीवरुन भविष्यात दाखल होणार्या गुन्ह्यामधून यातील तक्रारदार यांचे आरोपी म्हणून असलेले नाव कमी करण्यासाठी तसेच तक्रारदार यांचे इतर नातेवाईकांना या गुन्ह्यामध्ये अटकपुर्व जामीनसाठी सहकार्य करण्यासाठी वरील आरोपींनी दहा लाख रुपयांच्या लाचेची रक्कम गुन्ह्यातील रिकव्हरीच्या नावाखाली मागितली असल्याचे पडताळणीत निष्पन्न झाल्याचे वृत्तपत्रास प्रसिध्दीसाठी दिलेल्या पत्रकात लाचलुचपत पथकाने नमूद केले आहे.
या दहा लाखापैकी पहिला हप्ता पाच लाख रुपये दोन्ही आरोपींनी स्विकारताना पथकाने रंगेहाथ पकडले आहे.सदरची कारवाई पुणे विभागाचे पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधिक्षक शितल जानवे-खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधिक्षक उमेश पाटील,पोलीस निरीक्षक किशोरकुमार खाडे,पोलीस अंमलदार ऋषीकेश बडणीकर,प्रितम चौगुले, अजित पाटील यांच्या पथकाने आज दि.25 रोजी ही कारवाई केली.मंगळवेढा पोलीस ठाण्यात रात्री उशीरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती.