पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली अवैध गुटखा वाहतुकीवर धड़क कारवाई

पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची अवैध गुटखा वाहतुकीवर धड़क कारवाई

एक मालवाहुतक बोलरो पिकअप सह १९,२०,००० रु किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य मुद्देमाल ताब्यात

पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०२/२०२५- पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांना गोपनीय बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, एक पांढर्या बदामी रंगाच्या मालवाहतुक पिकअपमध्ये प्रतिबंधीत व विक्रीस मनाई केलेला गुटखा हा सांगोल्याचे दिशेने पंढरपुर मार्गे टेंभुर्णीकडे जात आहे.ही गोपनीय बातमी मिळाल्याने पंढरपुर शहर गुन्हे शाखेचे अंमलदार यांनी पंढरपुर शहर पोलीस ठाणे हद्दीतील सांगोला रोडवरील विक्रम ढाबासमोर सापळा लावला. रात्रौ ०९/३० वा चे सुमारास बातमीतील वर्णनाचा मालवाहतुक पिकअप हा विक्रम ढाब्यासमोर रोडवर आला असता तो गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अंमलदार यांनी थांबवुन पिकअप चालकाकडे पिकअपमधील मालाबाबत विचारणा केली असता पिकअप चालकाने गाडीमध्ये प्रतिबंधीत असलेला विमल पान मसाला,आर.एम.डी पानमसाला व एम सुगंधित तंबाखु असलेचे सांगितल्याने सदरचा पिकअप नं एम.एच-१० डीटी ४५१७ व त्यामध्ये महाराष्ट्रात प्रतिबंधित व विक्रीस मनाई असलेला गुटखा तसेच पिकअप चे चालकास ताब्यात घेवुन सदरचा मु‌द्देमाल पोलीस ठाणेस आणुन अन्न व औषध प्रशासन यांचेशी संपर्क करून पुढील कार्यवाही करीत आहे. या कारवाईत एकुण १९,२०,०००/- किंमतीचा मुद्देमाल चालका सह ताब्यात घेण्यात आला.

सदरची उल्लेखनीय कामगीरी ही सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी, अप्पर पोलीस अधिक्षक प्रितमकुमार यावलकर,पंढरपूर विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.अर्जुन भोसले व पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके मार्गदर्शनाखाली पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी स.पो.नि. आशिष कांबळे,पो.सई राजेश गोसावी,स.पो.फौ.शरद कदम, कल्याण ढवणे,सुरज हेंबाडे,सिरमा गोडसे, सचिन हेंबाडे,प्रसाद औटी,पोलीस नाईक सचिन इंगळे, पो.कॉ.शहाजी मंडले, समाधान माने,बजरंग बिचकुले,निलेश कांबळे, तुकाराम व्हरे यांनी केली आहे.

Leave a Reply

Back To Top