पंढरपूरात मनसेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
शिवभक्तांना मिठाई वाटप,रिक्षा रॅलीने वेधले लक्ष
पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर शहरात MNS महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला मनसे नेते दिलीप धोत्रे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी माढा चे आमदार अभिजीत पाटील, मनसे नेते दिलीप धोत्रे, माजी उपनगराध्यक्ष नागेश भोसले, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष नागेश गंगेकर, नगरसेवक लखन चौगुले, दत्ता काळे, मनसेचे अनिल बागल, गणेश पिंपळनेरकर,दिनेश चव्हाण, मधुकर फलटणकर,पप्पू भालेराव, संजु भालेराव, दत्ता भालेराव, पिंटू वाठारकर, बंडू वाठारकर, धनु देशमाने, नवनाथ रोकडे, दत्ता वाठारकर, दिपक वाखरकर,राजु खाडाखाडे,रमेश चव्हाण, मोहन भालेराव, सतिश झेंड, अशोक बिराजदार, सचिन भालेराव, भागवत मेटकरी, बंडु शिंदे, पांडु होनकळस, सोमा महारनवर,प्रभु चौहान यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी नवी पेठ परिसरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त दिलीप धोत्रे यांच्या हस्ते शिवभक्तांना मिठाई वाटप करण्यात आली.यावेळी फटाक्याची आतषबाजी करण्यात आली.
यानंतर पंढरपूर शहरात भव्य रिक्षा रॅली काढण्यात आली.या रिक्षा रॅलीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
छावा चित्रपट पाहण्यासाठी प्रोत्साहन म्हणून छावा चित्रपटाचे तिकीट दाखवा आणि हॉटेल ग्रँड, हॉटेल श्रीयश रेस्टॉरंट येथे जेवणाच्या बिलावर २५ टक्के सुट मिळवा या महाराष्ट्र निर्माण सेनेच्या उपक्रमाचा लाभ घ्यावा : मनसे नेते दिलीप धोत्रे
